Airtel च्या ग्राहकांसाठी मोठी बातमी ! कंपनीनं लॉन्च केले 3 जबरदस्त ‘प्लॅन’, मिळणार ‘हे’ फायदे, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – टेलिकॉम कंपनी भारती एअरटेलने आपल्या ग्राहकांसाठी तीन नवीन योजना सुरू केल्या आहेत. प्रीपेड आणि पोस्टपेड दोन्ही ग्राहक या योजनांचा लाभ घेऊ शकतात. या योजनांसोबतच कंपनीने आंतरराष्ट्रीय रोमिंगची काही वैशिष्ट्ये देखील जाहीर केली आहेत, ज्याचा फायदा परदेशात जाणारे किंवा परदेशी प्रवास करणाऱ्या वापरकर्त्यांना होईल. एअरटेल थँक्स अ‍ॅपचा उपयोग करून, पोस्टपेड आणि प्रीपेड दोन्ही ग्राहक त्यांच्या आंतरराष्ट्रीय रोमिंग पॅकचा वापर करू शकता. रियल टाइम बेसिसवर ट्रक करण्यास सक्षम असणार आहेत.

योजनांविषयी जाणून घ्या…
(१) ७९९ रुपये – या योजनेच्या माध्यमातून भारत आणि ज्या देशात आपण प्रवास करीत आहात, त्या देशासाठी १०० मिनिटे आणि ३० दिवसांसाठी तुम्हाला अमर्यादित इनकमिंग एसएमएस मिळेल.
(२) ११९९ रुपये – या नवीन योजनेत, १ जीबी डेटासह, भारत आणि आपण ज्या देशात प्रवास करीत आहात त्या देशासाठी १०० मिनिटे उपलब्ध असतील. अमर्यादित इनकमिंग एसएमएस देखील ३० दिवसांसाठी उपलब्ध असेल.
(३) ४९९९ रुपये – या योजनेत दररोज १ जीबी डेटा, अमर्यादित इनकमिंग कॉल, भारत आणि अन्य देशांमध्ये आऊटगोईंग कॉलिंगसाठी ५०० मिनिटे आणि १० दिवसांसाठी अनलिमिटेड इनकमिंग एसएमएस आहेत. ही योजना अद्याप सुरू करण्यात आलेली नाही आणि येत्या काही दिवसांत ती सुरू केली जाईल.

जाणून घ्या फायदे :
(१) जर ग्राहकांनी आंतरराष्ट्रीय रोमिंग पॅकमध्ये मिळालेले बेनिफिट संपविले तर डेटा सर्व्हिस बंद केली जाईल. जेणेकरून मर्यादेपेक्षा अधिक वापर झाल्यावर कोणतेही अतिरिक्त शुल्क आकारले जाणार नाही. ग्राहक एअरटेल थँक्स अ‍ॅपवर जाऊन आणखी एक पॅक किंवा टॉप अप मिळवू शकतात.
(२) एअरटेलचे पोस्टपेड ग्राहक आता त्यांची आंतरराष्ट्रीय रोमिंग सेवा इनेबल आणि डिसेबल करण्यास सक्षम असतील. यासाठी त्यांना एअरटेल थँक्स अ‍ॅपवर जाऊन क्लिकवर जावे लागेल.
(३) एअरटेलचे प्रीपेड ग्राहक आता प्रवासाच्या तारखेच्या ३० दिवस आधी आंतरराष्ट्रीय रोमिंग अ‍ॅप खरेदी करू शकतात. यामध्ये, पॅकची वैधता त्यांच्या आंतरराष्ट्रीय मोबाइल नेटवर्कशी कनेक्ट झाल्यानंतरच सुरू होईल.
(४) या व्यतिरिक्त एअरटेलने ग्राहकांसाठी नवीन ग्लोबल पॅक सादर केले आहेत. हे पॅक ज्या देशांमध्ये लोक सर्वाधिक प्रवास करतात त्यांना कव्हर करेल. याद्वारे, लोक एका पॅकवर जगभर प्रवास करू शकतील.