Airtel चा ३६५ दिवसांची व्हॅलिडीटीचा ‘सुपरडूपर’ प्लॅन, मिळणार ५११ GB ‘डाटा’

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – टेलिकॉम कंपनी एअरटेल आपल्या प्रतिस्पर्धांना टक्कर देण्यासाठी एक नवीन प्लॅन बाजारात आणत आहे. एवढेच नाही तर एअरटेल आपल्या रिचार्ज प्लॅनला अपग्रेड देखील करत आहे. या नव्या प्लॅनमध्ये ग्राहकांना जास्त डाटा देण्यावर भर देण्यात येणार आहे. या बरोबर जास्त कालावधीची वैधता देण्यात आली आहे. एअरटेलने आपल्या प्लॅनमध्ये १६९९ रुपयांचा प्लॅन अपग्रेड केला आहे. ज्यात ग्राहकांना आधीच्या मानाने अधिक डाटा मिळणार आहे.

एअरटेल १६९९ चा प्लॅन –

या प्लॅनची वैधता ३६५ दिवस असणार आहे. यात ग्राहकांना आधी १ जीबी डाटा देण्यात येत होता मात्र आता प्रतिदिन १.४ जीबी डाटा देण्यात येणार आहे. म्हणजे डाटा मध्ये जवळपास ४० टक्के जास्त डाटा उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. या वैधते दरम्यान ग्राहकांना ५११ जीबी डाटा देण्यात येणार आहे.

अनलिमिटेड कॉलिंग-

यात प्लॅनमध्ये कंपनी ग्राहकांना अनलिमिडेट लोकल कॉल, एसटीडी आणि रोमिंग कॉलची सुविधा देणार आहे. तसेच यात मेसेजची सुविधा देखील देण्यात आली आहे, जी दिवसाला १०० मेसेज एवढी असेल.

एअरटेल टिव्ही प्रीमियम सब्सक्रिप्शन –

यात ग्राहकांला मोबाईल संबंधित सर्व सुविधा देण्यात आल्या असल्या तरी कंपनी या प्लॅन मध्ये एअरटेल टिव्ही प्रीमियम सब्सक्रिप्शन देखील उपलब्ध करुन देणार आहे. एका वर्षासाठी फ्री मोबाईल सिक्युरिटी आणि नवी ४ जी डिवाइसवर कॅशबॅक देखील मिळेल.

रोज रात्री झोपण्यापूर्वी चेहरा स्वच्छ धुवा…होतील हे चांगले परिणाम

आरोग्याच्या किरकोळ समस्यांवर करा ‘हे’ नैसर्गिक उपचार

‘या’ कारणांमुळे येऊ शकतो ‘अकाली बहिरेपणा’, अशी घ्या काळजी

केसांचे नुकसान का होते ? जाणून घ्या या समस्येमागील कारणे

अनुसूचित जातीमध्ये १७ ओबीसी जाती समाविष्ट करण्याचा योगी सरकारचा निर्णय बेकायदा

भरपावसात विधिमंडळाच्या पायऱ्यांवर बसून बच्चू कडू यांचं अन्नत्याग आंदोलन