महानायक अमिताभ आणि अभिषेकनंतर आता ऐश्वर्या आणि मुलगी आराध्या देखील कोरोना पॉझिटिव्ह

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – महानायक अमिताभ बच्चन आणि त्यांचा मुलगा अभिषेक बच्चन हे कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे शनिवारी रात्री उशिरा समोर आले होते. अमिताभ आणि अभिषेक यांना नानावटी रूग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर बच्चन कुटुंबियांची कोरोना चाचणी झाली. त्यामध्ये अभिनेत्री आणि अभिषेकची पत्नी ऐश्वर्या आणि मुलगी आराध्या यांचा कोरोना टेस्टचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याची माहिती समोर आली आहे. त्याबाबत राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ट्विट करून माहिती दिली आहे.

दरम्यान, जय्या बच्चन यांची टेस्ट निगेटिव्ह आल्याचे सांगण्यात येत आहे. अमिताभ नंतर अभिषेक आणि आता ऐश्वर्या आणि आराध्या हे कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे समोर आल्याने प्रचंड खळबळ उडाली आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like