Aishwarya Rai Bachchan | ऐश्वर्या राय – बच्चनला सिन्नर तहसिलदारांनी बजावली नोटीस; जाणून घ्या काय आहे नेमके प्रकरण?

पोलीसनामा ऑनलाइन टीम – अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन (Aishwarya Rai Bachchan) अनेक दिवसांपासून लाईम लाईट पासून दूर जरी असली तरी पुन्हा एकदा ती चर्चेत आली आहे. ऐश्वर्या राय चर्चेत येण्याचे कारण म्हणजे तिला नुकतीच सिन्नर तालुकाच्या तहसीलदारांनी नोटीस बजावली आहे. सिन्नर तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यात ठाणगाव जवळील अडवाडीच्या डोंगराळ भागात ऐश्वर्याची जमीन असल्याने तिला ही नोटीस बजावण्यात आली आहे. त्या जमिनीचा कर भरला नसल्याने ही नोटीस तिला बजावण्यात आली आहे. (Aishwarya Rai Bachchan)

 

मिळालेल्या माहितीनुसार ऐश्वर्या रायचे सिन्नर तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यात ठाणगाव जवळील अडवाळीच्या डोंगराळ भागात ही जमीन आहे. एक हेक्टर 22 आर जमीन असून त्याचा एक वर्षाचा कर भरला नाही म्हणून हि नोटीस देण्यात आली आहे. त्या वर्षभराच्या कराची किंमत 21,970 रुपयांची असे थकबाकी आहे. हि थक बाकी जमा करण्यासाठी तिला ही नोटीस बजावण्यात आली आहे.

 

सिन्नरच्या तहसीलदारांकडून केवळ ऐश्वर्यालाच नाही तर 1200 मालमत्ताधारकांना नोटीस बजावण्यात आली आहे.
दरम्यान पवन ऊर्जा निर्मिती क्षेत्रातील सुझलॉन कंपनीत अनेक नेते, कलाकारांनी गुंतवणूक केल्याचे समजत आहे.

 

Web Title :- Aishwarya Rai Bachchan | aishwarya rai bachchan got notice from tehsil office about pending tax in sinnar land

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Sanjay Raut | निवडणुक आयोगातील सुनावणी पुढे ढकलल्यानंतर संजय राऊत यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले…

Nandurbar ACB Trap | दहावीचे मार्कशीट देण्यासाठी विद्यार्थ्याकडून लाच घेताना मुख्याध्यापक अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

Shehnaaz Kaur Gill | अभिनेत्री शहनाज गिलच्या विंटर लूकने चाहते थक्क; शेअर केले खास लूकमधील फोटो