Ajit Pawar In Vidhansabha | सभागृहातल्या मंत्र्यांच्या अनुपस्थितीमुळे विरोधी पक्षनेते अजित पवार संतापले

‘लक्षवेधी’सूचनांना उत्तर द्यायला मंत्रीच सभागृहात उपस्थित नसतात; सभागृहात मंत्री नसल्याने सभागृह तहकुब करण्याची नामुष्की येते

मुंबई : Ajit Pawar In Vidhansabha | आपल्या मतदार संघातल्या विविध प्रश्नांची तयारी करुन सदस्य सभागृहात येत असतात. विविध संसदीय आयुधांचा वापर करुन ते आपले प्रश्न सभागृहात मांडत असतात. मात्र सरकारमधील मंत्री सदस्यांच्या प्रश्नांचा उत्तर द्यायला सभागृहात उपस्थित नसतात. त्यामुळे अनेक वेळा सभागृह तहकुब करण्याची वेळ येते ही गंभीर बाब आहे, हे वारंवार घडत आहे, या प्रकरणी संबंधितांना कडक शब्दात समज देण्यात यावी अशी मागणी विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केली. यावर विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांनी तीव्र नापसंती व्यक्त करत सरकारने याची गंभीर दखल घेण्याची सूचना सरकारला दिली. (Ajit Pawar In Vidhansabha)

विरोधी पक्षनेते अजित पवार म्हणाले (Ajit Pawar In Vidhansabha), राज्यातील सर्वसामान्यांचे, कष्टकऱ्यांचे, शेतकऱ्यांचे तसेच आपल्या मतदार संघातील प्रश्न विविध संसदिय आयुधांचा वापर करुन सभागृहात आपले प्रश्न मांडत असतात.

या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी तसेच सरकारकडून याबाबत उत्तर देण्यासाठी विधानसभेत विशेष बैठकीचे
आयोजन करण्यात येते. मात्र सरकार मधील मंत्री याबाबत गंभीर नसतात.
सदस्यांच्या प्रश्नांना उत्तर द्यायला मंत्री सभागृहात उपस्थित नसतात.
मंत्री उपस्थित नसल्याने सभागृह तहकुब करण्याची नामुष्की अनेक वेळा येते.
सभागृहाच्या शिस्तीला धरुन हे योग्य नाही तरी संबंधितांना कडक शब्दात समज देण्याची मागणी
विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सभागृहात केली.

Web Title :-  Ajit Pawar In Vidhansabha | Leader of Opposition Ajit Pawar was irked by the absence of ministers from the House

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Japan International Cooperation Agency (JICA) | राज्यातील विविध मोठ्या प्रकल्पांना अर्थसहाय करण्याबाबत मुख्यमंत्र्यांची ‘जायका’समवेत चर्चा

Rita India Foundation | रिता इंडिया फाऊंडेशनच्या सौजन्याने ‘महिलांचे आरोग्य आणि जागरूकता’ याविषयावरील कार्यशाळा संपन्न

Sayaji Shinde | अभिनेते सयाजी शिंदेवर पुणे बंगळुरु महामार्गावरील झाडाचे पुनर्रोपण करत असताना मधमाशांकडून हल्ला