Ajit Pawar NCP On Maharashtra Assembly Election | विधानसभा निवडणूक महायुती एकत्र लढणार का?, अजितदादांच्या आमदाराचं सूचक वक्तव्य

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – Ajit Pawar NCP On Maharashtra Assembly Election | राज्यात लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर महायुतीतील घटकपक्ष विधानसभा निवडणूक स्वतंत्र लढणार अशी एक चर्चा सुरु झालेली आहे. शिवसेना शिंदे गट (Eknath Shinde) आणि राष्ट्रवादी अजित पवार गट सोबत असतानाही भाजपाला अपयश (BJP) मिळाले. अपयशानंतर भाजप पक्षांतर्गत एक सर्व्हे करत असल्याची माहिती आहे. मात्र भाजपकडून हे फेटाळण्यात आले आहे.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुखपत्रातूनही अजित पवार (Ajit Pawar) यांना सोबत घेऊन भाजपने स्वत:ची ब्रँड व्हॅल्यू कमी केली. त्यामुळे महाराष्ट्रात पक्षाला झटका बसला आहे. भाजप आणि शिंदे यांच्या शिवसेनेकडे बहुमत होते, मग अजित पवार यांना घेण्याची गरज काय होती? असा प्रश्न त्या लेखात विचारण्यात आला आहे.(Ajit Pawar NCP On Maharashtra Assembly Election)

दरम्यान आता आगामी विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीसोबत लढणार की स्वबळावर लढणार याबाबत राज्याच्या राजकारणात चर्चा सुरु झाल्या आहेत. त्यातच आता या सर्व पार्श्वभूमीवर अजित पवार गटाचे इंदापूरचे आमदार दत्तात्रय भरणे (Dattatray Bharne) यांनी सूचक प्रतिक्रिया दिली आहे.

इंदापूरमध्ये देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार जो निर्णय घेतील तो आम्हाला आणि हर्षवर्धन पाटील यांना सुद्धा मान्य असेल, असे दत्तात्रय भरणे म्हणाले आहेत. हर्षवर्धन पाटील आणि आम्ही सध्या बरोबर आहे. आम्ही एकत्र आहोत, मीडियाने आमच्यात उगाच भांडणे लावू नयेत.

दुसरीकडे विधानसभा निवडणुकीसाठी अजित पवार गटाकडून इंदापूरमधून दत्तात्रय भरणे हेच उमेदवार असतील असे चित्र आहे. तर हर्षवर्धन पाटील यांच्या कन्या सुद्धा याच मतदारसंघामधून इच्छुक आहेत. त्यामुळे महायुतीच्या जागा वाटपावरुन महायुतीमध्ये काय परिस्थिती असणार हे पाहणं तितकंच महत्वाचं आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Sinhagad Road Pune Crime News | पुणे: सिंहगड रस्ता परिसरात आयुर्वेदिक मसाजच्या नावाखाली सुरु होता वेश्या व्यवसाय, गुन्हे शाखेकडून पर्दाफाश

Chandan Nagar Pune Crime News | पुणे: तुमच्यावर मनी लाँड्रींगची केस! चौकशीची भीती घालून सायबर गुन्हेगारांकडून महिलेला 13 लाखांचा गंडा

Sinhagad Express | मोटरमनने वेगमर्यादा न पाळल्याने सिंहगड एक्सप्रेस पकडताना प्रवाशाचा मृत्यू

Harshvardhan Patil On Sugar Export | साखर उत्पादनाचा अंदाज चुकल्यानेच केंद्राची निर्यातीवर बंदी; हर्षवर्धन पाटलांची कबुली