Ajit Pawar On Maharashtra Load Shedding | अजित पवारांकडून मोठा दिलासा, म्हणाले – ‘…पण, राज्यात भारनियमन होऊ देणार नाही’

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Ajit Pawar On Maharashtra Load Shedding | कोळसा (Coal) कमी पडल्याने राज्यात वीज भारनियमन (Maharashtra Load Shedding) सुरू झालं असल्याची माहिती राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत (Maharashtra Energy Minister Nitin Raut) यांनी दिली आहे. उन्हाळ्यात (Summer Season) अचानक वीजेच्या मागणीमध्ये वाढ झाली आहे. मात्र अशातच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी राज्यात वीज भारनियमन होऊ देणार नसल्याचं म्हटलं आहे.

 

राज्यासह देशामध्ये कोळशाचा तुटवडा आहे त्यामुळे भारनियमनातं संकट आहे पण आम्ही भारनियमन होऊ देणार नाही.
मार्केटमधून वीज खरेदी करण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे.
वीज भारनियमन होणार नाही यासाठी सर्व खबरदारी घेत असल्याचं अजित पवार यांनी सांगितलं.

 

उन्हाची तीव्रता वाढल्यामुळे वीज शॉर्टेज निर्माण झाला आहे. कोळशाचा तुटवडा झाला असून कोळसा मिनिस्ट्रीलाही (Coal Ministry) सांगण्यात आलं आहे.
कमी दिवसाचा कोळसा आहे तो वाढवून घ्या. मार्केटमध्ये जिथे वीज आहे ति विकत घेण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत त्याबाबतची सर्व परवानगी कॅबिनेटने दिल्याचं अजित पवारांनी सांगितलं.

 

दरम्यान, राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनीही यामध्ये लक्ष्य घातलं असून त्यामुळे प्रश्नावर तोडगा निघेल अशी अपेक्षा असल्याचं अजित पवार म्हणाले.
मात्र बाजारातून जी वीज घेतली जाते तीसुद्धा उपलब्ध होत नसल्याचं नितीन राऊत यांनी म्हटलं होतं.

 

 

Web Title :- Ajit Pawar On Maharashtra Load Shedding | maharashtra thackeray government to purchase power from private sector says ajit pawar

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा