Ajit Pawar On PI Shekhar Bagde | ‘त्या’ पोलीस निरीक्षकाकडे (Police Inspector) बेहिशेबी मालमत्ता आली कुठून? अजित पवारांनी पत्रकार परिषदेत वाचून दाखवली प्रॉपर्टीची लिस्ट (व्हिडिओ)

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Ajit Pawar On PI Shekhar Bagde | डोंबिवलीतील भाजपचे (Dombivli BJP) पदाधिकारी नंदू जाधव (Nandu Jadhav) यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा (Molestation Case) दाखल झाल्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक शेखर बागडे (Senior Police Inspector Shekhar Bagde) चर्चेत आले आहेत. बागडे यांनी गुन्हा (FIR) दाखल करण्यात पुढाकार घेतल्याने भाजप आणि शिंदे गटात (Shinde Group) वाद सुरु झाला आहे. अशातच विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी बागडे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. बागडे यांच्याकडे बेहिशेबी मालमत्ता (Unaccounted Assets Of Shekhar Bagde) असल्याचा आरोप अजित पवार यांनी केला आहे. तसेच याची चौकशी व्हावी अशी मागणी त्यांनी केली आहे. (Ajit Pawar On PI Shekhar Bagde)

 

 

अजित पवार यांनी पत्रकार परिषदेमध्ये वरिष्ठ पोलीस निरीक्षक शेखर बागडे (Ajit Pawar On PI Shekhar Bagde) यांनी बेहिशेबी मालमत्ता जमवल्याचा आरोप करत त्यांच्या प्रॉपर्टीची लिस्ट (Property List Of PI Shekhar Bagde) वाचून दाखवली. नाशिकमध्ये जमिन (Nashik Land), व्यावसायिक गाळे, फ्लॅट्स, नवी मुंबईत मोक्याच्या जागी त्यांच्या सदनिका आहेत. त्याने एवढी सगळी मालमत्ता कशी जमवली? असा सवाल उपस्थित करताना शेखर बागडे यांच्या चौकशीची मागणी अजित पवार यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Home Minister Devendra Fadnavis) यांच्याकडे केली आहे. तसेच पुण्याचे अतिरिक्त विभागीय आयुक्त डॉ. अनिल रामोड (IAS Dr. Anil Ramod) यांच्याकडे 6 कोटींची रोख रक्कम सापडली. सरकारचा प्रशासनावर कोणताही धाक नसल्याने अधिकाऱ्यांची सर्रास भ्रष्टाचाराची प्रकरणे समोर येत असल्याची टीका अजित पवार यांनी केली.

 

 

लिस्ट वाचता अजित पवारांना लगला दम…

अजित पवार म्हणाले, शेखर बागडे यांची देवळाली कॅम्प येथे तीन मजली व्यावसायिक मालमत्ता आहे, निवासी फ्लॅट सुमंगल रेसिडन्सी (महात्मा नगर नाशिक), तिरुमल्ला हाईट्स (रविवार पेठ नाशिक) येथे दुकान आणि व्यावसायिक गाळे आहेत. तसेच रिद्धी सिद्धी कन्स्टक्शन मध्येही त्यांची गुंतवणूक आहे. महावीर अमृत सोसायटी सानपाडा नवी मुंबईत देखील त्याचा फ्लॅट आहे.
पांडुर्ली भागात त्याची शेतजमीन आहे. इगतपुरी देखील त्याची शेतजमीन आहे.

 

एका साध्या पोलीस ऑफिसरकडे एवढी मालमत्ता कशी काय असू शकते? एवढी मालमत्ता त्याने कशी आणि कुठून मिळवली?
अनेकांनी त्याच्याबद्दल तक्रारी केल्या आहेत. त्यामुळे मी देखील त्याच्या चौकशीची मागणी करणार आहे.
गृहमंत्र्यांनी शेखर बागडे यांची चौकशी करावी, अशी मागणी अजित पवार यांनी केली.

 

Web Title :  Ajit Pawar On PI Shekhar Bagde | NCP leader ajit pawar demanding investigating
senior police inspector shekhar bagde unaccounted assets thane

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा