Ajit Pawar On Ravindra Dhangekar | पोलिस आयुक्तांनी पैसे खाल्ल्याच्या धंगेकरांच्या आरोपांवर अजित पवार भडकले; पालकमंत्री म्हणाले – ‘बिनबुडाचे आरोप करून काहीही साध्य होणार नाही’

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – Ajit Pawar On Ravindra Dhangekar | कल्याणीनगर येथील मद्यपान करून पोर्शे कार चालवल्याने या अपघातात दोघांचा मृत्यू झाला. या घटनेचा राज्य तसेच देशभरातून संताप व्यक्त केला जात आहे. (Porsche Car Accident Pune)

आमदार रवींद्र धंगेकर यांनी या अपघाताच्या घटनेवरून पोलिसांना धारेवर धरले आहे. आमदार धंगेकर यांनी पोलीस आयुक्तांवर आरोप केले आहेत. ” या घटनेच्या तपासात पोलिसांकडून अनेक चुका झाल्या ज्यामुळे पोलीस प्रशासन आणि पुण्यनगरीच्या कायदा व सुव्यवस्थेबाबत अनेक प्रश्नचिन्ह उभे राहिले. सर्व व्यवस्थेची बदनामी झाली. तपास अधिकाऱ्यापासून ते कमिशनर पर्यंत सर्व व्यवस्था विकली गेलेली आहे. या प्रकरणात डीलिंग कोणी केले ? कोणत्या हॉटेलात झाले? पोलीस आयुक्तांना कसे पाकीट गेले ?” याचा तपास करण्याची मागणी आमदार धंगेकर यांनी केली आहे. (Kalyani Nagar Accident)

अपघात झाल्यांनतर दोन तरुणांचा मृत्यू घडल्यानंतरही सदर अल्पवयीन मुलगा आणि त्याचे वडील घरी आराम करीत होते ही कोणती नीतिमत्ता ? पैसे खाल्ल्याशिवाय हे घडूच शकत नाही. आपण रस्त्यावर येऊन याबाबत आवाज उठविणार असल्याचे त्यांनी सांगितले.(Ajit Pawar On Ravindra Dhangekar)

“कल्याणीनगर दुर्घटनेत अगोदर जामीन मिळालेल्या बिल्डरच्या मुलाला कोर्टाने १४ दिवसांची रिमांड होमची कस्टडी मिळणे हे आपण दिलेल्या लढ्याला मिळालेले पाहिले यश आहे. जर आपण सर्वांनी आवाज उठवला नसता तर हे प्रकरण दाबले गेले होते.आता खरं या व्यवस्थेतील कचरा साफ करण्याची वेळ आहे. त्याची सुरुवात पोलीस कमिशनर (Pune CP) यांच्या पासून करायला हवी.

या प्रकरणात इतक्या गंभीर चुका होऊनही कमिशनने कुणावरही कारवाई केलेली नाही,याचाच अर्थ असा होतो हा गुन्हा दडपण्याच्या “डिल” मध्ये कमिशनर देखील सहभागी आहेत,त्यामुळे त्यांचे तातडीने बदली करण्यात यावी,अशी मागणी मी राज्याच्या गृहमंत्र्यांना करत असल्याचे त्यांनी म्हंटले आहे.

याबाबत पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांना माध्यमांनी प्रश्न विचारले असता अजित पवार म्हणाले, ” धंगेकरांनी केलेले आरोप मी माध्यमांमध्ये वाचले. याविषयी मी पोलीस आयुक्तांशी चर्चाही केलेली आहे. मुळात अशाप्रकारचे आरोप त्यांनी केले असतील तर पुरावे देणे महत्वाचे आहे. असे बिनबुडाचे आरोप करून काहीही साध्य होणार नाही” असे अजित पवारांनी म्हंटले. तसेच अशाप्रकारे कोणी आरोप करायला लागले तर त्यांचे काम करणे मुश्किल होईल , उगाच ‘उचलली जीभ लावली टाळ्याला’ याचा उपयोग नसल्याचेही पवारांनी म्हंटले आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Porsche Car Accident Pune | प्रसिद्धीच्या हेतूने अपघाताच्या घटनेवर रॅप सॉंग बनवल्याची कबुली

Surendra Kumar Agarwal Arrest | पोर्शे अपघात प्रकरणात पुणे पोलिसांची मोठी कारवाई ! अल्पवयीन आरोपीच्या आजोबांनाही अटक, ड्रायव्हरला डांबून ठेवले, धमकी दिली

Vidhan Parishad Election 2024 | विधान परिषद निवडणुकीसाठी शिवसेना ठाकरे गटाचे २ उमेदवार जाहीर; मुंबईतील ‘या’ दोन नेत्यांची निवड

Dombivli MIDC Blast | डोंबिवली स्फोटातील मृतांची संख्या वाढली, अजूनही सापडत आहेत मानवी अवशेष, आकडा आणखी वाढण्याची शक्यता

Maval Crime News | मावळात तळ्यात बुडून महाविद्यालयीन तरुणाचा मृत्यू

Porsche Car Accident Pune | पुणे पोर्शे अपघात प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेकडे, पुणेकरांना केले आवाहन, अग्रवाल कुटुंबियांबद्दल काही तक्रार असल्यास…