Ajit Pawar On Rohit Pawar | महाराष्ट्रात आणखी एका काक-पुतण्यात संघर्ष, रोहित पवारांच्या आरोपावर अजित पवारांचे रोखठोक प्रत्युत्तर

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – Ajit Pawar On Rohit Pawar | राज्यात आजपर्यंत अनेक काका-पुतण्यामध्ये संघर्ष पाहायला मिळाला आहे. त्यातच आता आणखी एका काका-पुतण्याच्या संघर्षाचा नवा अध्याय सुरु झाल्याचे बोलले जात आहे. कारण उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुतण्या आणि आमदार रोहित पवारांच्या आरोपांना जशास तसं प्रत्युत्तर दिलं आहे. पिंपरी चिंचवडचा कायापालट मी केला असल्याचं वक्तव्य करत अजित पवारांनी रोहित पवारांना रोखठोक उत्तर दिलं आहे. दरम्यान, शरद पवार (Sharad Pawar) यांच्यामुळे पिंपरी चिंचवड (Pimpri Chinchwad) शहर वाढल्याचे विधान रोहित पवार यांनी केलं होतं. (Ajit Pawar On Rohit Pawar)

बारामती नंतर पिंपरी चिंचवड राष्ट्रवादीचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. मात्र या बालेकिल्ल्यात अजित पवारांचे वर्चस्व असल्याचे बोलले जात आहे. हाच बालेकिल्ला शरद पवार यांना पुन्हा एकदा काबीज करायचा असल्याने रोहित पवार मैदानात उतरले आहेत. त्यामुळे आगामी काळात काका-पुतण्यामध्ये सामना रंगल्याचे पाहायला मिळणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. (Ajit Pawar On Rohit Pawar)

काय म्हणाले रोहित पवार?

शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी काही दिवसांपूर्वी पिंपरी चिंचवड शहराचा दौरा केला होता. त्यावेळी त्यांनी अजित पवार यांच्यावर निशाणा साधला होता. ते म्हणाले, पिंपरी चिंचवडमध्ये शरद पवार यांच्यामुळेच अजितदादांचं महत्त्व वाढलं, त्यांच्या याच वक्तव्यावरुन अजित पवार यांनी रोखठोख प्रत्युत्तर दिलं आहे.

काय म्हणाले अजित पवार?

अलिकडे काही मंडळी पिंपरी चिंचवडमध्ये येऊन, नको ते भाष्य करत आहेत. पण या शहराचा कायापालट कोणी केला?
प्राध्यापक रामकृष्ण मोरेंच्या नंतर माझ्याकडे शहराची जबाबदारी आली, त्यावेळी अनेक कठोर निर्णय घेऊन मी
शहराला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवलं. पण काही जण शहरात येऊन वेगळं वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न
करत आहेत, असं अजित पवार म्हणाले.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

ACB Trap Case | पोलीस चौकीत लाच घेताना पोलीस कर्मचारी अँन्टी करप्शनच्या जाळ्यात

Punit Balan Group Felicitates Rituja Bhosle | पुनीत बालन ग्रुपच्या पाठीब्यामुळेच सुवर्णपदकाला गवसणी; ऋतुजा भोसले हिचे उद्गार (Video)