Varunraj Bhide Journalism Award | सध्या व्यवस्थेविरुद्ध लिहिणाऱ्या पत्रकाराला देशद्रोही म्हटले जातेय, हे लोकशाहीला लांच्छनास्पद : अनंत बागाईतकर

पत्रकारीतेत उल्लेखनिय कार्य केल्याबद्दल समर खडस, शैलेश काळे, अरुण मेहेत्रे, डी. के. वळसे-पाटील यांचा विशेष पुरस्कार देऊन गौरव

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन- Varunraj Bhide Journalism Award | पत्रकार वरूणराज भिडे मित्र मंडळातर्फे पत्रकारीतेत उल्लेखनिय कार्य केलेल्या पत्रकारांचा गौरव करण्यात आला. अनंत बागाईतकर (Anant Bagaitkar) आणि डॉ. डी. वाय पाटील शिक्षण संस्थेचे कुलपती डॉ. पी. डी. पाटील (Dr PD Patil) यांच्या हस्ते या पत्रकारांना गौरवण्यात आले. यावेळी ज्येष्ठ पत्रकार अनंत बागाईतकर यांनी पत्रकारितेतील दाहक वास्तव सर्वांसमोर मांडले. सध्या व्यवस्थेविरुद्ध लिहिणाऱ्या पत्रकाराला देशद्रोही म्हटले जातेय, हे लोकशाहीला लांच्छनास्पद आहे, तसेच वेगवेगळ्या माध्यमातून पत्रकारांवर दबाव टाकला जात असल्याचे वास्तव त्यांनी मांडले.

या सोहळ्यात पत्रकारीतेत उल्लेखनिय कार्य केल्याबद्दल समर खडस (Samar Khadas), शैलेश काळे (Shailesh Kale), अरुण मेहेत्रे (Arun Mehetre), डी. के. वळसे-पाटील (DK Walse Patil) यांना विशेष पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. यावेळी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, आमदार उल्हासदादा पवार, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रवक्ते अंकुश काकडे, निवड समितीचे सत्यजित जोशी, शैलेश गुजर, सुर्यकांत पाठक आदी यावेळी उपस्थित होते. यावेळी बागाईतदार बोलत होते.

अनंत बागाईतकर यांनी म्हटले की, व्यवस्थेविरुद्ध लिखान करणारा पत्रकार म्हणजे तो देशद्रोही अशा स्वरूपाच्या वर्गवार्‍या गेल्या काही वर्षांमध्ये पत्रकारीतेत तयार केल्या जाऊ लागल्या आहेत. हे लोकशाहीच्या दृष्टीने लांछनास्पद आहे.

ते पुढे म्हणाले, पत्रकारांनी सामान्य जनतेच्या प्रश्नांशी नाळ जोडली पाहिजे. जेव्हा पत्रकार सामान्यांच्या प्रश्नासाठी आवाज उठवतो, तेव्हा त्या पत्रकाराचा व्यवस्थेशी संघर्ष हा अटळ असतो. मात्र, पत्रकारांनी या संघर्षापासून पळ काढता कामा नये, असेही बागाईतकर म्हणाले.

पत्रकारितेतील सध्याच्या भीषण वास्तव मांडताना अनंत बागाईतकर म्हणाले, व्यवस्थेच्या बाजूने लिखान केल्यास तुम्ही पत्रकार. आणि विरोधात लिखान केल्यास पत्रकारांवर विविध प्रकारचे शिक्के मारले जात आहेत. सध्याच्या घडीला वेगवेगळ्या माध्यमातून पत्रकारांवर दबाव टाकला जात आहे.

पत्रकारांचे कर्तव्य सांगताना बागाईतकर म्हणाले, कौतुक करणे हे पत्रकाराचे काम नाही हे लक्षात घेतले पाहिजे. समाजात घडणार्‍या गोष्टींचे बारकावे शोधून सत्यपरिस्थिती समाजापुढे मांडणे म्हणजे पत्रकारीता आहे. वस्तूनिष्ठ आणि अचूक असलेली बातमी कोणीही दाबू किंवा नाकारू शकत नाही.

बागाईतकर पुढे म्हणाले, बातमी लिहिताना ती वस्तूनिष्ठ आणि सोप्या शब्दांत असेल याची काळजी पत्रकारांनी घेतली पाहिजे.
पत्रकार जेव्हा सामान्यांचे प्रश्न मांडतो तेव्हा त्याचा व्यवस्थेशी संघर्ष हा अटळ असतो.
मात्र, पत्रकारांनी या संघर्षापासून पळ न काढता, दबावाला बळी न पडता सामान्यांचे प्रश्न मांडले पाहिजे.

सध्याच्या घडीला तंत्रज्ञानाचे सर्वात मोठे आव्हान पत्रकारांपुढे उभे ठाकले आहे.
मात्र, काही वेळा वस्तूनिष्ठता आणि अचूकपणाचा अभाव पत्रकारीतेत दिसतो.
त्यामुळे तंत्रज्ञानाला वस्तूनिष्ठता आणि अचूकतेची जोड देण्यासाठी प्रयत्न झाला पाहिजे, असे बागाईतकर म्हणाले.

डॉ. पी. डी. पाटील यांनी पत्रकारितेसमोरील आव्हाने मांडताना म्हटले की, सध्या कृत्रिम बुद्धीमत्ता वाढत असून,
त्यातून समाजात गैरसमज निर्माण केले जात आहेत. त्यामुळे पत्रकारीतेपुढे खर्‍या अर्थाने आव्हाने उभी ठाकली आहेत.
पत्रकारांनी या आव्हानांचा सामना करताना संयम बाळगून वस्तूनिष्ठ गोष्टी सामान्य जनतेपर्यंत पोहचवल्या पाहिजे.

तर काँग्रेस नेते उल्हासदादा पवार म्हणाले, काही वर्षांपासून पत्रकारांपुढील आव्हाने वाढत आहेत.
तंत्रज्ञानाच्या काळात वस्तुनिष्ठ पत्रकारीता करताना पत्रकारांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.
मात्र, पत्रकार समर्थपणे ही आव्हाने पेलतील, असा विश्वास पवार यांनी व्यक्त केला.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. शैलेश गुजर यांनी केले. तसेच समर खडस, शैलेश काळे, डी. के. वळसे-पाटील,
अरूण म्हेत्रे यांनी मनोगत मांडले. तर कार्यक्रमाचे प्रास्तविक अंकुश काकडे यांनी केले.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Swargate Pune Crime | पुणे : अल्पवयीन मुलीचा विनयभंग, स्वारगेट परिसरातील घटना

PM Modi Sabha In Pune | पंतप्रधान मोदींच्या पुण्यातील सभास्थळावरील फ्लेक्स तुफान व्हायरल, सुशिक्षित बेरोजगाराची व्यथा, ”युवकांचा आक्रोश तुम्हाला…”