Ajit Pawar Vs Sharad Pawar | शरद पवार एका बाजूला आणि संपूर्ण पवार कुटुंब एका बाजूला, अशीही झाली होती एक निवडणूक, अजित पवारांनी सांगितला जुना किस्सा

बारामती : पोलीसनामा ऑनलाइन – Ajit Pawar Vs Sharad Pawar | बारामती लोकसभा मतदारसंघातील (Baramati Lok Sabha) निवडणूक यावेळी संपूर्ण देशात चर्चेचा विषय झाली आहे. येथे पवार कुटुंबातीलच नणंद विरूद्ध भावजयी असा सामना होत आहे. मात्र, संपूर्ण पवार कुटुंबिय शरद पवार यांच्या बाजूने म्हणजे सुप्रिया सुळेंच्या (Supriya Sule) बाजूने उभे आहे. तर अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार (Sunetra Ajit Pawar) यांच्या विरोधात प्रचार देखील पवार कुटुंब (Pawar Family) करत आहे. मात्र, एकेकाळी अशीही निवडणूक झाली होती ज्यात, संपूर्ण पवार कुटुंब एका बाजूला आणि शरद पवार एका बाजूला होते. स्वत: अजित पवार यांनी हा जुना किस्सा एका वृत्तपत्राला मुलाखत देताना सांगितला.

अजित पवार म्हणाले, १९६२ ला असा प्रसंग पवार कुटुंबामध्ये उद्भवला होता. त्यावेळी आमचे थोरले काका दिवंगत वसंतदादा पवार हे शेतकरी कामगार पक्षाकडून बारामतीमधून पोटनिवडणूक लढवत होते. आमच्या आजी-आजोबांसह संपूर्ण कुटुंब त्यांचा प्रचार करत होते. मात्र शरद पवारसाहेब तेव्हा काँग्रेसचा प्रचार करत होते. त्यावेळेस संपूर्ण परिवार एका बाजूला आणि एकटी व्यक्ती एका बाजूला असे चित्र होते.

अजित पवार म्हणाले, त्यावेळी राजकारणात सक्रिय असणाऱ्यांना हा इतिहास माहिती आहे.
पण या गोष्टीला पन्नास वर्षांपेक्षा जास्त काळ लोटल्याने आजच्या नवीन पिढीला हे माहिती नाही. त्याची फारशी चर्चा होत नाही.
मी याचा उल्लेख केल्यावर काही जणांनी माहिती घेतली आणि त्यांना खरी माहिती समजली, असे अजित पवार म्हणाले.

तसेच यंदाच्या बारामती लोकसभा निवडणुकीत पवार कुटुंबातील कोण आपल्या बाजुने, कोण सुप्रिया सुळेंच्या बाजूने
आणि कोण तटस्थ याबाबत देखील माहिती अजित पवार यांनी या मुलाखतीमध्ये दिली.

अजित पवार म्हणाले, पवार कुटुंबामध्ये मी एकटा आहे, असे नाही, हेही समोर आले. जे राजकारणामध्ये नाहीत ते तटस्थ आहेत. यामध्ये आमचे थोरले बंधू राजेंद्र पवार यांचा परिवार, माझे धाकटे बंधून श्रीनिवास पवार यांचा परिवार आणि शरद पवार साहेबांचा परिवार हे तीनच परिवार एका बाजूला आहेत आणि माझा परिवार एका बाजूला आहे.

आमचे पवारांचे कुटुंब किती मोठे आहे हे तुम्हालाही माहिती आहे. त्यामुळे यामध्ये इतर कुणी तसा भाग घेतलेला नाही.
दोघेही आम्हाला सारखेच अशी भूमिका त्यांनी घेतलेली आहे. तसेच राजकारण आमचा पिंड नाही, असे त्यांनी म्हटले आहे.
त्यामागे काही आणखी कारणे आहेत, ती मी इथे सांगत नाही, अजितदादा म्हणाले.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Swargate Pune Crime | पुणे : अल्पवयीन मुलीचा विनयभंग, स्वारगेट परिसरातील घटना

PM Modi Sabha In Pune | पंतप्रधान मोदींच्या पुण्यातील सभास्थळावरील फ्लेक्स तुफान व्हायरल, सुशिक्षित बेरोजगाराची व्यथा, ”युवकांचा आक्रोश तुम्हाला…”