Ajit Pawar On Yogi Adityanath | अजित पवारांकडून योगी आदित्यनाथांच्या दाव्याचे खंडन ! समर्थ रामदास नव्हे, राजमाता जिजाऊच शिवरायांच्या गुरु (Video)

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Ajit Pawar On Yogi Adityanath | राजमाता जिजाऊ यांनी शिवाजी महाराजांना घडविले. त्याच शिवरायांच्या गुरु आणि मार्गदर्शक होत्या, त्यांनी महाराजांना प्रेरणा दिली. याच प्रेरणेतून स्वराज्य स्थापन करायचे या ध्येयाने शिवरायांनी मावळ्यांचे सैन्य उभे करुन स्वराज्याची उभारणी केली, हा इतिहास आहे. याच इतिहासातून महाराष्ट्र प्रेरणा घेतो, अशी रोखठोक भूमिका राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मांडली.

ते राष्ट्रवादी काँग्रेसने येत्या शिवजयंतीनिम्मिताने आयोजित केलेल्या स्वराज्य सप्ताहाच्या शुभारंभाप्रसंगी बोलत होते.

समर्थ रामदास स्वामींच्या मार्गदर्शनामुळे शिवरायांना पुढील कार्य करता आले, असा दावा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी रविवारी आळंदीत एका कार्यक्रमात बोलताना केला होता. यानंतर राज्यभरातील शिवप्रेमींनी संताप व्यक्त केला. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही योगींच्या दाव्याचे खंडन केले होते. आता अजित पवारांनीही रोखठोक भूमिका मांडली आहे.

अजित पवार यांनी शरद पवारांच्या सुरात सुर मिसळला आहे. योगी आदित्यनाथ यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना शरद पवार यांनी म्हटले होते की, काही लोक वेगळी भूमिका मांडण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र, खरा इतिहास काय आहे तो जगाला माहिती आहे. आमच्यादृष्टीने राजमाता जिजाबाई याच छत्रपती शिवाजी महाराजांच्या मार्गदर्शक होत्या.

काय म्हणाले होते योगी आदित्यनाथ…

रविवारी आळंदी येथे गीता-भक्ती अमृतमोहत्सव सोहळ्यात उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी म्हटले होते की, समर्थ रामदास स्वामी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना घडविण्याचे काम केले.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

API And Two Lady Cops Suspended In Pune | पुणे: सहाय्यक पोलिस निरीक्षकासह (API) दामिनी पथकातील 2 महिला पोलिस तडकाफडकी निलंबीत

Shiv Sena MP Sanjay Raut | अशा पद्धतीने ते २०० पार सुद्धा जाणार नाहीत, संजय राऊत यांचा भाजपावर जोरदार हल्लाबोल

Ashok Chavan | भाजपा प्रवेशानंतर आदर्श घोटाळ्याबाबत अशोक चव्हाण म्हणाले, ”हा चिंतेचा विषय…”