Ajit Pawar – RSS – BJP | संघाच्या मुखपत्रातून राष्ट्रवादीचा उल्लेख करत भाजपावर टीका; अजित पवार म्हणाले, “मला फक्त…”

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – Ajit Pawar – RSS – BJP | राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुखपत्रातून अजित पवारांशी केलेल्या हातमिळवणीवर भाष्य करत भाजपाचे कान टोचले. यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले. रतन शारदा यांनी कोणत्याही नेत्याचे नाव न घेता म्हटले की, ” भाजपने अशा काँग्रेस नेत्याचा पक्षात समावेश केला, ज्याने उघडपणे भगव्या दहशतवादाबद्दल विधान केले होते. त्याने २६/११ ला आरएसएसचे षडयंत्र म्हटले होते. तसेच आरएसएसला दहशतवादी संघटना म्हटले होते. यामुळे आरएसएस समर्थक खूप दुखावले गेले.(Ajit Pawar – RSS – BJP)

भाजपमध्ये आलेल्या या नेत्यांनी त्यांच्या या विधानावर खेद व्यक्त केला नाही किंवा माफी मागितली नाही. महाराष्ट्रातील या खेळीमुळे अनेक वर्ष काँग्रेसी विचारधारेला विरोध करणारा सच्चा भाजप समर्थक दुखावला. भाजप पार्टी विथ डिफरन्स अशी ओळख सांगतो, परंतु भाजपची ओळख पार्टी विदाऊट एनी डिफरन्स अशी झाली आहे.” अजित पवार यांना सोबत घेऊन भाजपने स्वत:ची ब्रँड व्हॅल्यू कमी केली. त्यामुळे महाराष्ट्रात पक्षाला झटका बसला आहे. भाजप आणि शिंदे यांच्या शिवसेनेकडे बहुमत होते, मग अजित पवार यांना घेण्याची गरज काय होती? असा प्रश्न त्या लेखात विचारण्यात आला आहे.

यावर आता अजित पवारांनी प्रत्युत्तर दिले आहे.
पुण्यात माध्यमांशी संवाद साधताना याबाबत त्यांना प्रश्न विचारला असता अजित पवार म्हणले की ,
” मला याबाबत काही बोलायचं नाही. निवडणूक झाल्यांनतर प्रत्येकजण आपले मत मांडत असतो.
लोकशाहीत प्रत्येकाला आपले मत मांडण्याचा किंवा भूमिका स्पष्ट करण्याचा पूर्ण अधिकार आहे.
मला फक्त विकासाच्या मुद्द्यावर लक्ष द्यायचे आहे. महत्वाची कामे कशी मार्गी लागतील याचा मी विचार करतो आहे.
त्यानुसार येणाऱ्या विधानसभेत नव्या उमेदीने पुढे जाण्याचा माझा प्रयत्न आहे” अशी प्रतिक्रिया अजित पवारांनी दिली आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Katraj Pune Crime News | पुणे : हॉटेल व्यवसायिकांकडून 5 लाख खंडणी घेणाऱ्या नमस्कार प्रतिष्ठानचा अध्यक्ष निखील शिंदे आणि सिद्धार्थ रणपिसेला अटक

Katraj Pune Crime News | पुणे : हॉटेल व्यवसायिकांकडून 5 लाख खंडणी घेणाऱ्या नमस्कार प्रतिष्ठानचा अध्यक्ष निखील शिंदे आणि सिद्धार्थ रणपिसेला अटक

Alibag – Pune Crime News | अती धाडस तरुणाला जीवावर बेतले, पुण्यातील तरुणाचा अलिबागच्या समुद्रात बुडून मृत्यू

Aundh Pune Crime News | पुणे: लिलावात स्वस्तात गाडी देण्याच्या बहाण्याने साडे 9 लाखांची फसवणूक, दोघांना अटक

Nilesh Lanke-Gajanan Marne | नवनिर्वाचित खासदार निलेश लंके वादाच्या भोवऱ्यात, पुण्यातील कुख्यात गुंड गजा मारणेची भेट घेत स्वीकारला सत्कार (Video)