Ajit Pawar-Sharad Pawar | … म्हणून 2004 ला मुख्यमंत्रीपद नाकारल्याचा अजित पवारांचा दावा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – Ajit Pawar-Sharad Pawar | राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुट्ल्यानांतर दोन गट निर्माण झाले. त्यात राष्ट्रवादी शरद पवार गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गट. पक्ष फ़ुटीनंतर दोन्ही गटाकडून विविध दावे करण्यात येत आहेत.(Ajit Pawar-Sharad Pawar)

मागेच २००४ साली मुख्यमंत्री पदासाठी योग्य उमेदवार पक्षात नसल्याची प्रतिक्रिया शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत दिली होती. त्यावरून एका दगडात त्यांनी अनेक पक्षी मारल्याचेही बोलले जात होते.

अनेकांचा रोख हा छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) आणि अजित पवारांकडे होता. याबाबत छगन भुजबळ यांनी माध्यमांसमोर येत याबाबत आपली प्रतिक्रिया दिली होती. आजच्या पत्रकार परिषदेत अजित पवार यांनी यावर भाष्य केले आहे. २००४ ला मुख्यमंत्री पद घेतले असते तर आजपर्यंत ते कायम राहिले असते असे म्हणत शरद पवार हे धादांत खोटे बोलत असल्याचे अजित पवारांनी सांगितले.

” त्यावेळी राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री व्हावा हे आम्हा सगळ्यांना वाटत होते.
त्यावेळी मला मुख्यमंत्री पदात रस नव्हता मात्र छगन भुजबळ मुख्यमंत्री होतील असे वाटत होते.
पक्ष स्थापनेपासून त्यांनी गावोगावी जाऊन संघटना वाढवण्याचे काम केले.
त्या काळात इतके वातावरण निर्माण होऊनही राष्ट्रवादीला ५८ जागा मिळाल्या होत्या.
त्यांनतर २००४ मध्ये काँग्रेसपेक्षा जास्त जागा राष्ट्रवादीला मिळाल्या होत्या असे अजित पवारांनी यावेळी सांगितले.

पुणे अजित पवार म्हणाले , ” तसेच १९९१ शरद पवारांना संरक्षण मंत्री केंद्रात जायची वेळ आली तेव्हा बहुतांश आम्ही सगळे काँग्रेस आमदार सेवासदनला बसले होते.
तेव्हा एकत्र काँग्रेस होती. आमदारांच्या बैठकीत पद्मसिंह पाटलांचं नाव पुढे आलं होतं, त्यावेळी सुधाकरराव नाईकांचं
नावही चर्चेत नव्हतं. सुधाकरराव नाईक यांच्या हाताखाली आम्ही सगळ्यांनी काम केले.
केंद्रात जाताना शरद पवारांनी पद्मसिंहांना खुर्ची न देता नाईकांना पुढे आणलं आणि सरकार बनवलं.
१९९१ नंतर १३ – १४ वर्षांनी अशी संधी आली होती तेव्हा कुणी नवखे होते हे म्हणायचं कारण नव्हतं.
पण आता काहीपण सांगतायेत ” असेही अजित पवारांनी म्हटले.

” दरम्यान, नाईकांना मुख्यमंत्री केल्यानंतर त्यांनी एक वर्षही साहेबांचं ऐकलं नाही. १७ लोकांना आम्हाला मंत्रिमंडळातून काढले.
तिथून सगळी गडबड झाली. २००४ ला कदाचित हा विचार शरद पवार – प्रफुल पटेल यांच्यात झाला असेल की,
१९९१ ला मुख्यमंत्री करून एक वर्षात कुणी ऐकले नाही आता जर मुख्यमंत्री केले तर आपल्या दोघांना कायम
दिल्लीला पाठवतील. त्यामुळे मुख्यमंत्री पद घेतले नसेल.” असे अजित पवार यांनी भाष्य केले आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Dr Ajay Taware – Dr Shrihari Halnor Arrest | ब्लड सॅम्पल बदलण्यासाठी ससून हॉस्पिटलमधील डॉक्टरने 3 लाख घेतले

Ravindra Dhangekar On Sassoon Doctors | पोर्शे कार अपघात प्रकणात ससूनच्या डॉक्टरांना अटक, धंगेकर म्हणाले – ‘त्या रात्री अनेकांनी आपलं ईमान विकलंय, सगळं हळूहळू समोर येईल’

Dr Ajay Taware – Dr Shrihari Halnor Arrest | डॉक्टरांनी अल्पवयीन मुलाचे रक्ताचे नमुने घेऊन कचऱ्यात टाकल्याची पोलीस आयुक्तांची माहिती (Video)

Dr Ajay Taware – Dr Shrihari Halnor Arrest | लॅबमध्ये डीएनए टेस्टिंग नंतर रक्ताचे सॅम्पल बदलल्याचे समोर; पोलीस आयुक्तांची माहिती (Video)