Ravindra Dhangekar On Sassoon Doctors | पोर्शे कार अपघात प्रकणात ससूनच्या डॉक्टरांना अटक, धंगेकर म्हणाले – ‘त्या रात्री अनेकांनी आपलं ईमान विकलंय, सगळं हळूहळू समोर येईल’
![Ravindra Dhangekar On Sassoon Doctors | Sassoon doctor arrested in Porsche car accident case, Dhangekar said - 'Many people sold their faith that night, everything will come out slowly'](https://i0.wp.com/policenama.com/wp-content/uploads/2023/10/MLA-Ravindra-Dhangekar.webp?resize=700%2C400&ssl=1)
पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – Ravindra Dhangekar On Sassoon Doctors | पुणे पोर्शे कार अपघातप्रकरणात (Porsche Car Accident Pune) एक धक्कादायक आणि खळबळजनक बातमी समोर आली आहे. या प्रकरणातील बिल्डर विशाल अग्रवालच्या (Vishal Agarwal Builder) मुलाला वाचविण्यासाठी ससूनच्या दोन डॉक्टरांनी रक्ताच्या नमून्यांची अदलाबदल केल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. यानंतर पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने (Pune Crime Branch) या दोन्ही डॉक्टरांना अटक केली आहे.(Ravindra Dhangekar On Sassoon Doctors)
पोर्शे कार अपघातात ससूनचे डॉ. अजय तावरे (Dr Ajay Taware) आणि डॉ. श्रीहरी हळनोर (Dr Shrihari Halnor) यांना पोलिसांनी अटक केल्यानंतर अपघात प्रकरणात सतत आवाज उठवणारे काँग्रेसचे कसब्याचे आमदार रविंद्र धंगेकर यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करुन धक्कादायक आरोप केले आहेत.
रवींद्र धंगेकर यांनी फेसबुक पोस्टमध्ये म्हटले आहे की, पुण्यातील कल्याणीनगर कार अपघात प्रकरणात ससुन रुग्णालयाच्या २ डॉक्टरांना अटक करण्यात आली आहे. ब्लड रिपोर्टमध्ये (Blood Report) फेरफार केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. तुम्हाला आम्हाला काही तासात मिळणारे ब्लड रिपोर्ट या केसमध्ये जेव्हा सात दिवस होऊनही मिळत नव्हते, तेव्हाच हा प्रकार संशयास्पद वाटत होता.
याच ससूनमध्ये मयत अश्विनी कोस्टा (Ashwini Costa) यांच्या नातेवाईकांनी मृतदेह अजून अर्धा तास शवगृहात ठेवा,
आमची अँब्युलन्स येत आहे, अशी विनंती केली होती. मात्र, रुग्णालय प्रशासनाने अर्धा तास वाढवून द्यायला देखील नकार
दिला होता. असो. हे वाटतं तेवढ सोप्पं नाही. त्या रात्री अनेकांनी आपले ईमान विकले आहे. जे आता हळू हळू जगासमोर येईल,
असे धंगेकर यांनी म्हटले आहे.
दरम्यान, अग्रवाल कुटुंबीयांच्या नातेवाईकांनी ससूनच्या दोन डॉक्टरांना पैशांचे आमिष दाखवले.
विशाल अग्रवाल याने अजय तावरे यांना फोन केल्याची माहिती कॉल डिटेल्समधून समोर आली आहे.
त्यानंतर या दोघांनीही अल्पवयीन मुलगा अल्कोहोल टेस्टमध्ये निर्दोष ठरावा, यासाठी त्याच्या रक्ताच्या नमुन्यांऐवजी
एका दुसऱ्याच रुग्णाच्या रक्ताचे सॅम्पल (Blood Sample Collection) फॉरेन्सिक लॅबकडे दिले. आज दोघांना कोर्टासमोर हजर केले जाईल.
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
हे देखील वाचा
Abhijit Panse | अभिजित पानसेंची उमेदवारी ही मनसेची की महायुतीची? भाजपच्या निर्णयाकडे लक्ष