Dr Ajay Taware – Dr Shrihari Halnor Arrest | लॅबमध्ये डीएनए टेस्टिंग नंतर रक्ताचे सॅम्पल बदलल्याचे समोर; पोलीस आयुक्तांची माहिती (Video)
![Blood Sample Tampering Case Pune | Pune Blood Report Alteration Case: Who advises blood sample alteration? Big information came out](https://i0.wp.com/policenama.com/wp-content/uploads/2024/05/Swapping-Teens-Blood-Sample.webp?resize=700%2C400&ssl=1)
पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – Dr Ajay Taware – Dr Shrihari Halnor Arrest | ससून रुग्णालयातील (Sassoon Hospital) फॉरेन्सिक लॅबचे प्रमुख डॉ. अजय तावरे आणि डॉ. श्रीहरी हळनोर या दोघा डॉक्टरांना कल्याणीनगर अपघात प्रकरणातील (Kalyani Nagar Accident) अल्पवयीन मुलाच्या रक्ताच्या नमुन्यात फेरफार केल्याप्रकरणी अटक केली आहे. (Swapping Teen’s Blood Sample)
रक्ताच्या नमुन्याच्या अहवालात फेरफार केल्याबाबत पोलिसांना शंका आल्यावर त्यांनी रक्ताचे नमुने औंध (Aundh Hospital) याठिकाणी तपासणीसाठी दिले असता औंधला दिलेले सँपल हे आरोपीचे होते , ते त्याच्या वडिलांच्या ब्लड सँपलशी मॅच झाले. पण, ससून चे सँपल हे अल्पवयीन मुलाचे नव्हते, हे स्पष्ट झाले. ही हेराफेरी लक्षात आल्यांनतर पोलिसांनी दोन डॉक्टरांना अटक केली. डीएनए टेस्ट (DNA Test) केल्यांनतर पोलिसांच्या हा सर्व प्रकार लक्षात आला अशी माहिती पोलीस आयुक्त अमितेश कुमार (Pune CP Amitesh Kumar) यांनी दिली.(Dr Ajay Taware – Dr Shrihari Halnor Arrest)
पुणे कल्याणीनगर येथे बिल्डर विशाल अगरवाल याच्या मुलाने मद्यपान करून केलेल्या अपघातात दोन तरुण अभियंत्यांचा
मृत्यू झाला होता. हा अल्पवयीन मुलगा आपल्या मित्रांसमवेत महागडी पोर्शे कार घेऊन पार्टी करण्यासाठी गेला होता.
या घटनेननंतर हॉटेलमधील सीसीटीव्ही तपासल्यानांतर त्याने मद्यपान केल्याचे निदर्शनास आले.
याबाबत त्याच्या रक्ताचे नमुने ससून रुग्णालयात पाठवण्यात आले होते.
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
हे देखील वाचा
Abhijit Panse | अभिजित पानसेंची उमेदवारी ही मनसेची की महायुतीची? भाजपच्या निर्णयाकडे लक्ष