पिचकारीवीरांच्या मनोवृत्तीला जिल्हाधिकाऱ्यांनी गांधीगिरीतून हाणली सणसणीत चपराक

अकोला : वृत्तसंस्था

अकोल्याचे जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय यांनी गांधीगिरीने सर्वांना चकित केले आहे. या ‘गांधीगिरी’ने सार्वजनिक ठिकाणी पान खाऊन थुंकणाऱ्या ‘पिचकारीवीरां’च्या मनोवृत्तीला सणसणीत चपराक हाणली आहे.

जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय यांनी काल अकोल्यातील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयाला अचानक भेट दिली. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी कार्यालयातील भिंती अस्वच्छ दिसल्या. पान, तंबाखू, खाऊन थुंकल्यामूळे रंगलेल्या भिंती, कार्यालयात झालेले कोळ्यांचे जाळे, धुळीने माखलेल्या फाईल पाहून जिल्हाधिकाऱ्यांचा पारा चढला. जिल्हाधिकाऱ्यांनी स्वत: बकेट आणि पाणी घेत ती भिंत साफ करायला सुरूवात केली. कार्यालयातील अस्वच्छतेसंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांना चांगलंच फैलावर घेतलं.
जिल्हाधिकाऱ्यांच्या या कृत्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकारी- कर्मचाऱ्यांवर चांगलंच खजिल व्हायची वेळ आली.

जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या दोन दिवसात स्वछता करण्याच्या सूचना

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता कार्यालयात अस्वच्छतेचे साम्राज्य पसरल्याचं पाहून जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय यांनी कार्यकारी अभियंता मिथिलेश चौहान यांना दोन दिवसात कार्यालयातील साफसफाई करण्याचे निर्देश दिले.
तसेच जिल्हाधिकारी पाण्डेय यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला लागूनच असलेल्या जलसंपदा विभागाच्या कार्यालयालाही भेट देऊन पाहणी केली. त्यामध्ये एका कक्षाच्या प्रवेशद्वारावर असलेले जाळे स्वत:च्या हाताने काढून, कार्यालय स्वच्छ ठेवण्याच्या सूचना संबंधित कर्मचाऱ्यांना दिल्या.

काँग्रेसचे दिग्विजय सिंह, जयराम रमेश नक्षलवाद्यांचे हितचिंतक; भाजपाचा काँग्रेसवर हल्लाबोल

[amazon_link asins=’B072XP1QB7,B0778JFC13′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’6121722b-b03f-11e8-b078-c9b7633cf434′]