अकोल्यातील प्रयोगशाळा, वैज्ञानिक अधिकारी संघटनेचा संपाला पाठिंबा 

अकोला : पोलीसनामा ऑनलाईन

सातवा वेतन आयोग लागू होण्यासह अन्य मागण्यांकरिता आज पासून तीन दिवस म्हणजेच दिनांक ७, ८, ९ ऑगस्ट रोजी सरकारी कर्मचाऱ्यांनी राज्यव्यापी संप पुकारला आहे. या संपात अकोला जिल्हा प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी संघटनेने देखील सहभाग घेतला असून त्यांनी देखील तीन दिवस या संपात सहभाग घेतला आहे.
[amazon_link asins=’B01951R2S2′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’563c060e-9a52-11e8-b0f4-c76c2f842482′]

याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, अकोला यथील हिवताप आणि हत्तीरोग विभागातील प्रयोगशाळेतील अधिकारी यांनी देखील संपात सहभागी असल्याचे सांगितले आहे. २०१६ साली वेतन वाढीकरिता प्रस्ताव पाठवण्यात आला होता मात्र सातवा वेतन आयोगाची कारणे पुढे करून वेतनवाढ केलीच नाही असे मत संघटनेच्या अध्यक्षांनी व्यक्त केले आहे. वेतनवाढ न मिळाल्यामुळे त्रस्त झालेल्या कर्मचाऱ्यांनी संपाला पाठिंबा देण्याचे ठरवले आहे.

प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी संवर्गावर सेवाअंतर्गत आश्वांसीत प्रगती योजना, पदशृंखलेमध्ये होणारी तफावत तसेच पदोन्नती (आरोग्य पर्यवेक्षक सहाय्यक, जिल्हा हिवताप अधिकारी, हिवताप व हत्तीरोग अधिकारी) प्रलंबित असणे याबरोबरच जुनी पेन्शन योजना लागू न केल्यामुळे आरोग्य कर्मचाऱ्यांच्या मध्ये असंतोष आहे. म्हणूनच दिनांक ७, ८,९ ऑगस्टच्या राज्य मध्यवर्ती कर्मचारी व महाराष्ट्र राज्य प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी संघटना  शाखा अकोला संपामध्ये सहभागी होत असल्याची माहिती यावेळी संघटनेच्या अध्यक्षा के आर ठाकरे, उपाध्यक्ष अयाज अहमद , सचिव व्ही एस वखरे, कोषाध्यक्ष के व्ही पांडे, सहसचिव वाय एस सरोदे ,कोषाध्यक्षा ए एम मोहरील, संघटक के बी ठोंबरे, एस एस डोंगरे, सि आर उपराथ, एस बी देशमुख, आर पी पांडे यांनी दिली.