खादीचे कपडे घालणे शासकीय कर्मचार्‍यांना बंधनकारक, तर टी शर्ट, जिन्स पॅन्टवर बंदी

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   अलीकडे सोशल मीडिया गृपवर एक संदेश व्हायरल झाला होता त्यात ‘जिन्स-टी शर्ट’ विकणे आहे’ असं स्पष्ट लिहलं होतं. हा विषय हास्यापद आहे असं सगळ्यांचं वाटलं. परंतु, शासनानेच हे शासकीय कार्यालयातील अधिकारी-कर्मचारी यांच्यासाठी कार्यालयात वेशभूषा कशी असावी यासाठी नुकतेच परीपत्रक काढले आहे. त्या पार्श्वभूमीवर हा संदेश फिरत होता. शासकीय कार्यालयातील अधिकारी-कर्मचारी वर्गाने कर्तव्यावर असताना, येताना रंगीबेरंगी कपडे किंवा टि शर्ट, जिन्स घालून येणे हे शासकीय अधिकारी-कर्मचाऱ्याला शोभणारे नाही.

दरम्यान, विविध शासकीय कार्यालयामध्ये लोकप्रतिनिधी, अधिकारी, नगरसेवक, नागरिक विविध कामासाठी भेटी देतात. तेव्हा सर्वसामान्यांना अधिकारी, कर्मचारी वर्गाची ओळख होण्यास बाधा येत असते. अनेकदा अधिकारी, कर्चारी हे जिन्स टि शर्ट सारख्या वेशभूषेत असतात. त्यामुळे अनेकदा शासकीय अधिकारी-कर्मचाऱ्यांची ओळख होण्यास अडचणी येतात. त्यामुळे शासणाची प्रतिमा मलिन होते.

शासनाच्या परीत्रकातील या नव्या नियमाने कुठल्याही कार्यालयातील अधिकारी-कर्मचाऱ्यांची ओळख सर्वसामान्य नागरिकांना सहज होईल. परंतु, यापूर्वी अनेक अधिकारी-कर्मचारी वर्गाकडे जिन्स टि-शर्ट घेतलेले आहेत त्याचे काय करावे ? यासाठी अनेक सोशल मीडिया गृपवर ‘टि-शर्ट, जिन्स’ विकणे आहे. आशा प्रकारचे उपरोधिक संदेश पाहायला मिळत आहेत. दरम्यान, शासकीय अधिकारी-कर्मचारी वर्गाने यापुढे शोभनीय पेहराव करावा यामध्ये शर्ट-पॅन्ट, ट्राउझर, पॅन्ट आसा पेहराव करावा. तर महिला कर्मचारी वर्गाने साडी, सलवार, चुडीदार कुर्ता आसा पहेराव करावा. गडद रंगाचे कपडे किंवा चित्र विचित्र कपड्याचा वापर करू नये आशा प्रकारच्या अधिसूचना सदर परीपत्रकात नमुद आहेत. तसंच, पुरूष अधिकारी-कर्मचारी वर्गाने पायामध्ये बुट किंवा शांडल वापरने बंधनकारक आहे. तर, स्लिपर चप्पल घालण्यास मनाई केली आहे.