Akshay Kumar | चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान अक्षय कुमारला झाली दुखापत

पोलीसनामा ऑनलाइन – मनोरंजन सृष्टीत अनेक कलाकार स्वतः स्टंट करतात तर काही कलाकार बॉडी ड्बलचा वापर करतात. स्वतः स्टंट करण्याच्या यादीत अक्षय कुमार (Akshay Kumar) हा पहिल्या नंबरवर असतो. सेटवर धोकादायक ॲक्शन सिक्वेन्स आणि स्टंट करण्यासाठी अक्षय हा प्रसिद्ध आहे. सध्या तो ‘बडे मियाँ छोटे मियाँ’ या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. स्कॉटलंडमध्ये या चित्रपटाचे शूटिंग सुरू असताना अक्षयला (Akshay Kumar) दुखापत झाली आहे. या सीन मध्ये टायगर श्रॉफ (Tiger Shroff) सोबत ॲक्शन सिक्वेन्स शूट करताना अक्षयला हि दुखापत झाली आहे.

सुदैवाने यामध्ये अक्षयला (Akshay Kumar) कोणती ही गंभीर दुखापत झाली नाही. त्यामुळे त्यांनी शूटिंग सुरूच ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. हा स्पेशल अ‍ॅक्शन सिक्वेन्स सध्या थांबवण्यात आला आहे. परंतु अक्षयचे क्लोज अप शॉट सह शूटिंग सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार टायगर श्रॉफ सोबत एक ॲक्शन सीन करत असताना ही दुर्घटना घडली. यामध्ये अक्षयला एक विशेष स्टंट करायचे होते. सध्या अक्षयच्या गुडघ्यावर ब्रेसेस आहेत. त्यामुळे स्कॉटलंड मधील शूटिंग वेळेवर पूर्ण व्हावे यासाठी अक्षयचे क्लोज अप शूट घेण्यात येत आहेत. चित्रपटातील महत्त्वाचा ॲक्शन भाग सध्या थांबवण्यात आला आहे.

या चित्रपटात अक्षय आणि टायगर सोबत सोनाक्षी सिन्हा (Sonakshi Sinha) आणि पृथ्वीराज सुकुमारन
(Prithviraj Sukumaran) हे देखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत.
या चित्रपटाचे पहिल्या शेड्युलचे शूटिंग मुंबईत पूर्ण झाले आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन अली अब्बास जफर
(Ali Abbas Zafar) हे करत आहेत. ज्यांनी याआधी ‘टायगर जिंदा है’, ‘सुलतान’, ‘मेरे ब्रदर की दुल्हन’,
‘भारत’ आणि ‘गुंडे’ यासारखे चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. 1998 मध्ये ‘बडे मियाँ छोटे मियाँ’ हा चित्रपट
आला होता. या चित्रपटात अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan), गोविंदा (Govinda) यांची जोडी पहायला मिळाली. या चित्रपटाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले होते. आता या चित्रपटाचा सिक्वेन्स प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ज्यामध्ये अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफ यांची जोडी दिसणार आहे.

Web Title :-  Akshay Kumar | actor akshay kumar gets injured during shooting action scene for bade miyan chote miyan movie in scotland

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Congress MP Rahul Gandhi | वादग्रस्त विधान करणं राहुल गांधीना पडलं महागात, राहुल गांधी यांची खासदारकी रद्द

Udayanraje Bhosale | ‘तर मिशीच काय… भुवया पण काढून टाकेन आणि…’, उदयनराजेंचे चॅलेंज शिवेंद्रराजे स्वीकारणार का? (व्हिडिओ)

Pune Shivaji Nagar MLA Siddharth Shirole | पुण्याच्या विकासाचे आव्हान राज्य सरकारने स्वीकारले; मोठ्या प्रकल्पांना गती मिळावी – आमदार सिद्धार्थ शिरोळे