Akshay Kumar | अक्षय कुमारने पान मसाल्याचा जाहिरातीत काम करण्याबाबत केले मोठे वक्तव्य; म्हणाला – ‘ती माझी सर्वात मोठी चूक….’

पोलीसनामा ऑनलाइन : Akshay Kumar | गेल्या अनेक दिवसांपासून बॉलीवूड अभिनेता अक्षय कुमार हा खूपच चर्चेत आहे. अक्षय हा नेहमीच प्रत्येक गोष्टीवर उघडपणे भाष्य करत असतो. एवढेच नाही तर तो आपल्या चुका देखील नेहमीच स्वीकार करत असतो. काही दिवसांपूर्वी अक्षयचा सेल्फी हा चित्रपट प्रदर्शित झाला. मात्र या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर एवढी कमाल केली नाही. यादरम्यान एका कार्यक्रमात अक्षय कुमारने त्याच्या खाजगी त्याचबरोबर व्यवसायिक आयुष्यावर वक्तव्य केले आहे. त्यावेळी त्यांनी त्याच्या हातून झालेल्या चुकांवरही भाष्य केले आहे. (Akshay Kumar)
एका कार्यक्रमादरम्यान अक्षय कुमारला विचारण्यात आले होते की “आयुष्यात अशी कोणती चूक झाली आहे का त्यानंतर तुमच्या मनात त्याबद्दल विचार आला आणि तुमच्याकडून चूक झाली ही गोष्ट लक्षात आली? यावर अक्षयने विमल पान मसाल्याच्या जाहिरातीचा उल्लेख करत आपली चूक सांगितली. (Akshay Kumar)
यावेळी बोलताना अक्षय कुमार म्हणाला, “हो मी चूक केले आहेत आणि नंतर मला या गोष्टी जाणवल्या देखील आहेत आणि त्या मी खुल्या मनाने स्वीकारल्या देखील आहेत. जसे की मी पान मसाल्याची जाहिरात केली ती माझी एक मोठी चूक होती. ती जाहिरात झाल्यानंतर मला त्या दिवशी झोपच लागली नाही. माझ्या मनाला खूपच अस्वस्थ वाटत होते. मग काय मी माझ्या मनातील गोष्टी लिहिल्या. मला वाटते की माणूस चुकांमुळेच काही ना काही शिकत असतो. मी पण शिकलो, जेव्हा मी ते लिहिलं तेव्हा माझे मन स्थिर झाले”.
— Akshay Kumar (@akshaykumar) April 20, 2022
अक्षय कुमारने जेव्हा हि पान मसाल्याची जाहिरात केली होती त्यावेळी सोशल मीडियावर त्याला प्रचंड प्रमाणात
ट्रोल देखील करण्यात आले होते. अक्षय कुमारचे पान मसाला जाहिरातीत काम करणे चाहत्यांना अजिबातच
पटले नव्हते. ट्रोलिंग नंतर अक्षय कुमारने सोशल मीडियाच्या माध्यमातून पोस्ट शेअर करत चाहत्यांची माफी
देखील मागितली आणि यापुढे अशा प्रकारच्या जाहिरातीत काम करणार नाही असे देखील सांगितले होते.
Web Title :- Akshay Kumar | akshay kumar open up about his mistake and say he feel guilty for endorsing paan masala
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
Jalgaon Crime News | खासगी कामासाठी निघालेल्या शेतकऱ्याचा सिमेंटच्या ब्लॉकने केला घात