7 वर्षांनंतर एकत्र काम करणार ‘खिलाडी’ अक्षय आणि एकता कपूर !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – बॉलिवूड स्टार अक्षय कुमार सर्वात बिजी स्टार्सपैकी एक आहे. एकामागोमाग एक सिनेमात तो काम करताना दिसत असतो. गेल्या वर्षी त्याचे 4 सिनेमे रिलीज झाले होते. चारही सिनेमे हिट झाले होते. पुढील दोन वर्ष अक्षय पूर्ण बिजी आहे असं दिसत आहे. अक्षय सूर्यवंशी, लक्ष्मी बॉम्ब,, बच्चन पांडे, बेल बॉटम आणि पृथ्वारीज तसेच हेराफेरी यांसारख्या सिनेमात काम करणार आहे. अक्षयच्या या यादीत आता एकता कपूरचा सिनेमा अ‍ॅड झाला आहे. लवकरच अक्षय एकताच्या सिनेमातही दिसणार आहे.

एकता कपूरच्या आगामी सिनेमातून अक्षय कुमार आणि एकता कपूर आपल्या रियुनियनची तयारी करत आहेत. सूत्रांनी याबाबत माहिती दिली आहे. वन्स अपॉन टाईम इन मुंबई या सिनेमादरम्यान दोघांनी एकत्र काम केलं होतं. हा गँगस्टर ड्रामा सिनेमाला मिलन लुथरियना यांनी डायरेक्ट केला होता.

रिपोर्टनुसार, अक्षय कुमारनं 10 दिवसांपूर्वीच हा सिनेमा साईन केला आहे. या सिनेमाच्या लॉजिस्टिकची तयारीही सुरू आहे आणि स्क्रिप्ट फायनल केली जात असल्याची माहिती आहे. हा एक बिग बजेट सिनेमा असणार आहे. ज्यांनी अद्याप एकही सिनेमा डायरेक्ट केला नाही असे डायरेक्टर हा सिनेमा डायरेक्ट करणार आहेत.

अक्षय कुमार आणि एकता कपूर यांनी अनेक जॉनर्स एकत्र डिस्कस केले होते. अखेर चर्चेनंतर दोघांमध्येही अ‍ॅक्शन कॉमेडीवर सहमती झाल्याचं दिसून आलं होतं. या वर्षाच्या शेवटी या सिनेमाची शुटींग सुरू होणार असल्याचं समजत आहे. 2021 च्या सेकंड हाफमध्ये हा सिनेमा रिलीज केला जाण्याची तयारीही सुरू आहे.

You might also like