अक्षयकुमार आणि रजनीकांतच्या  चाहत्यांसाठी खुशखबर !!सिनेमाची  तारीख  अखेर जाहीर

मुंबई: पोलीसनामा ऑनलाईन

दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत आणि बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार  यांची प्रमुख भूमिका असलेला  बहुप्रतीक्षित ‘२.०’  या सिनेमाची  तारीख  अखेर जाहीर करण्यात आली आहे. २९ नोव्हेंबर २०१८ रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. एस शंकर आणि अक्षय कुमार यांनी ट्विट करून हि माहिती दिली आहे. ‘२.०’  या सिनेमाचं दिग्दर्शन एस शंकर करत आहेत.

यापूर्वी काला हा सिनेमा  रजनीकांत यांनी केला होता. कालाच्या यशानंतर त्यांनी २. ० हा सिनेमा केला आहे. सिनेमाचं बजेट  ३५० कोटी रुपयांच्या जवळपास असल्याचं बोललं जात आहे.अक्षय कुमार आणि रजनीकांत यांच्यासोबत  एमी जॅक्सन, सुधांशु पांडे आणि आदिल हुसैन यांसारखे कलाकार या सिनेमाच्या भूमिकेत आहेत.यापूर्वी १९९५ साली रजनीकांत यांचे ‘भाषा’ आणि ‘मुथु’ असे दोन चित्रपट  एकाच वर्षी प्रदर्शित झाले होते. त्यानंतर यंदा २०१८ मध्ये  त्यांचे  काला आणि २.० असे  एकापाठोपाठ दोन चित्रपट प्रेक्षकांना पाहता येणार आहेत. त्यामुळे रजनीकांत यांचे चाहते साहजिकच खुश आहेत.

[amazon_link asins=’B077PWBC7J’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’64b6bb2c-84ee-11e8-9978-57d7bd595334′]

अक्षयने या सिनेमात एका विक्षिप्त वैज्ञानिकाची भूमिका साकारली असून अक्षयचा हा पहिलाच तामिळ चित्रपट आहे. पहिल्यांदाच तो खलनायकाची व्यक्तिरेखा साकारणार आहे.सुपरस्टार रजनीकांत वसीगरन या वैज्ञानिकाच्या भूमिकेत दिसणार आहे. हा सिनेमा २०१० मधील ‘एंथिरन’ या तामिळ सिनेमाचा सीक्वेल आहे.‘2.0’ सिनेमाच्या प्रदर्शनाची तारीख आत्तापर्यंत अनेकदा लांबणीवर पडत होत्या.  यामुळे चित्रपटाचा बजेटही वाढला आहे.आधी हा बजेट १०० कोटी रूपये होता. पण सततच्या विलंबामुळे तो ५०० कोटींवर गेला. त्यामुळे हा चित्रपट आत्तापर्यंतचा सगळ्यात महागडा चित्रपट मानला जात आहे.पॅडमॅनआणि पद्मावत यांच्या तारखांमुळे  २. ० या सिनेमाच्या  तारीखा पुढे ढकलण्यात आल्या होत्या.

सर्व प्रथम हा चित्रपट २५ जानेवारी २०१८ ला  प्रदर्शित होणार होता. एकाच महिन्यात पॅडमॅन, पद्मावत व काला हे सिनेमे प्रदर्शित झाले त्यामुळे  हा सिनेमा पुढे ढकलण्यात आला. त्यानंतर २७ एप्रिल २०१८  या तारखेला सिनेमा प्रदर्शित होऊ शकला नाही. त्यानंतर आता मात्र २९ नोव्हेंबर २०१८ हि तारीख पक्की करण्यात आली आहे.