Video : कोटींची कमाई करणाऱ्या ‘खिलाडी’ अक्षयने १०० पाऊंड्ससाठी घेतलं ‘हे’ चॅलेंज !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमारला नुकतंच फोर्ब्सने हाईएस्ट पेड सेलेब्रिटीमध्ये समाविष्ट केलं होतं. अक्षय एकमेव असा भारतीय होता ज्याने फोर्ब्सच्या यादीत स्थान मिळवले होते. ४४४ कोटींच्या कमाईसोबतच अक्षय कुमार फोर्ब्सच्या ग्लोबल यादीत ३३ व्या क्रमांकावर होता. परंतु असे वाटत आहे की, कोटींची कमाई करणारा अक्षय पैसे कमावण्याची कोणतीही संधी सोडत नाही. त्यामुळे त्याने १०० पाऊंड कमावण्याचे चॅलेंज स्विकारले.

सध्या अक्षय कुमार फॅमिलीसोबत व्हॅकेशनवर आहे. ट्विंकल खन्नाने अक्षय कुमारचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. यात अक्षय पोलवर लटकला आहे आणि आपलं फिटनेस चॅलेंज पूर्ण करताना दिसत आहे. ठराविक वेळ हवेत असे लटकून राहण्याचे चॅलेंज पूर्ण करणाऱ्याला १०० पाऊंड मिळणार आहेत. ट्विंकलने हा व्हिडीओ शेअर करत अक्षयची खिल्ली उडवली आहे.

ट्विंकलने अक्षयचा व्हिडीओ शेअर करताना कॅप्शनमध्ये म्हटले आहे की, “Just hanging in there! Not happy with hitting the Forbes list- he wants to make a quick 100 pounds here as well 🙂 #GoofingAround.” ट्विंकलने शेअर केलेला हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर झपाट्याने व्हायरल होताना दिसत आहे. या व्हिडीओवर चाहतेही मजेदार कमेंट्स करताना दिसत आहे. एका युजरने म्हटले आहे की, “पैसे का चक्कर बाबू भैया, पैसे का चक्कर.” दुसऱ्या युजरने म्हटले आहे की, “भाई दुसरों को भी स्कीम बता दो.”

अक्षय कुमारच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे झाले तर, त्याचा आगामी सिनेमा मिशन मंगल १५ ऑगस्ट रोजी रिलीज होणार आहे. याशिवाय त्याचे अनेक सिनेमे रांगेत आहेत. ज्यात हाऊसफुल ४, गुड न्यूज, लक्ष्मी बॉम्ब आणि सुर्यवंशी अशा सिनेमांचा समावेश आहे. मिशन मंगल व्यतिरीक्त हाऊसफुल ४ आणि गुड न्यूजही याच वर्षी रिलीज होणार आहे.

महिलांनी ‘फिट अ‍ॅन्ड फाईन’ राहण्यासाठी ‘या’ टिप्स फॉलो कराव्यात

२० आजारांवरील ‘हे’ आहेत रामबाण घरगुती उपाय, आवर्जून लक्षात ठेवा

तजेलदार त्वचेसाठी ‘चालता-फिरता’ करा ‘हे’ १० ‘छोटे-छोटे’ उपाय !

‘या’ ७ गोष्टींचे सेवन केल्यास डोके आणि शरीर होईल शांत

मेडिटेशन करताना ‘घ्या’ या गोष्टींची काळजी

मासिक पाळीदरम्यान आपल्या त्वचेची ‘अशी’ घ्या काळजी

Loading...
You might also like