थिएटरमध्ये सिनेमा घेऊन येणारा पहिला स्टार ठरणार ‘खिलाडी’ अक्षय ? ‘या’ पब्लिक हॉलिडेला रिलीज होणार ‘सूर्यवंशी’ ?

पोलिसनामा ऑनलाईन – लॉकडाऊन हटवल्यानंतर अद्याप सिनेमागृहात अनेक सिनेमे रिलीज झाले आहेत. परंतु कोणताही सिनेमा बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई करताना दिसला नाही. गेल्या काही दिवसांपासून अशी चर्चा आहे की, अक्षय कुमारचा सूर्यवंशी हा सिनेमा थिएटरमध्ये रिलीज होणार आहे. लॉकडाऊननंतर बड्या बॉलिवूड स्टारचा थिएटरमध्ये रिलीज होणारा हा पहिला सिनेमा बनू शकतो, जो मोठ्या संख्येनं लोकांना आकर्षित करू शकतो. असं सांगितलं जात आहे की, हा सिनेमा 2 एप्रिल रोजी रिलीज केला जाऊ शकतो. या दिवशी पब्लिक हॉलिडे गुड फ्रायडे आहे.

तसं पाहिलं तर सिनेमाच्या रिलीजची अधिकृत घोषणा अद्याप झालेली नाही. एका इंग्रजी वृत्तानुसार, एका सूत्रांनी सांगितलं आहे की, रोहित शेट्टी सूर्यवंशी बद्दल थिएटर मालकांसोबत चर्चा करत आहे. सहनिर्माता रिलायन्स एंटरटेंमेंटही या मिटींग्सचा हिस्सा आहे. मेकर्सला सर्व अडचणींवर उपाय हवा आहे. जसं की, व्हिपीएप म्हणजे व्हर्चुअल प्रिंटचा खर्च, रेव्हेन्यु शेअरींग, थिएट्रीकल रिलीज, ओटीटी च्या मधला काळ इत्यादी. मेकर्सला आशा आहे की, लवकरच या सर्व मुद्द्यांवर सहमती मिळेल.

सूत्रांनी असंही सांगितलं की, सिनेमाच्या रिलीज डेटची घोषणा भव्य स्वरूपात केली जावी. निश्चितपणे काही तरी हटके केलं जाईल. अखेर लॉकडाऊन नंतर हा बॉलिवूडमधील पहिला मोठा सिनेमा आहे. नव्या रिलीज डेटची घोषणा कधी होईल असं विचारलं असता सूत्रांनी सांगितलं की, रिलीज डेटची घोषणी पुढील आठवड्यात होईल अशी आशा आहे.