इन्स्टाग्रामच्यावतीने अक्षय कुमारला खास अवॉर्ड

वृत्तसंस्ठा

अक्षय कुमारने काही महिन्यांपूर्वीपासून इन्स्टाग्राम अकाउंट सुरू केले आहे.आतापर्यंत त्याला तब्बल 2 कोटी फॉलोअर्स जॉईन झाले आहेत. थोड्या कालावधीतच इतके फॉलोअर्स मिळाल्याबद्दल अक्षयला इन्स्टाग्रामच्यावतीने एक खास अवॉर्ड पण दिले गेले आहे. या खास अवॉर्ड बरोबरचा एक फोटो अक्षयने सोमवारी आपल्या इन्स्टाग्रामवर पोस्ट केला आहे. “इन्स्टाग्रामला गोल्ड मिळाले.’ अशी कॅप्शनही अक्षयने दिली आहे.
[amazon_link asins=’B07DQGM1HD,B01IQZPLEA’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’20bae07d-a6cb-11e8-9553-59ef5a27e378′]

दीपिका पदुकोण, आलिया भट, प्रियांका चोप्रा, श्रद्धा कपूर यांच्यासारख्या ऍक्‍ट्रेसच्या इन्स्टाग्राम अकाउंटलाही 2 कोटींपेक्षा अधिक फॉलोअर्स मिळाले आहेत. पण इन्स्टाग्रामवर इतक्‍या मोठ्या संख्येने फॉलोअर मिळालेला अक्षय हा पहिला पुरुष अभिनेता बनला आहे.