Alaya F ने बाल्कनीत उभे राहून आपल्या रोमियोला दिला आवाज, केली ‘ही’ खास डिमांड

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – बॉलीवुड अभिनेत्री अलाया एफ (Alaya F) ने सोशल मीडियावर आपल्या नवीन पोस्टमध्ये विल्यम शेक्सपियरच्या रोमियो आणि ज्युलिएटची अतिशय मजेशीर प्रकारे उल्लेख केला आहे. अलायाने इंस्टाग्रामवर एक छायाचित्र पोस्ट केले, ज्यामध्ये ती बाल्कनीमध्ये उभी राहिलेली दिसत आहे. लवेंडर ब्रालेट आणि डेनिम्सच्या कपड्यांत ती खुप सुंदर दिसत आहे.

दिले असे कॅपशन
शेयर केलेल्या छायाचित्राला तिने कॅपशन देताना लिहिले की, ओ रोमियो, माझे सनटॅन लोशन कुठे आहे? अलाया सोशल मीडियावर छायाचित्रे आणि व्हिडिओजच्या माध्यमातून आपल्या फॅन्सचे मनोरंजन करत असते.

फॅन्स देत आहेत अशी प्रतिक्रिया
यापूर्वी अलायाने आपल्या गोवा व्हेकेशनमधून सुद्धा फोटो शेयर केले होते, जे खुप वायरल झाले होते. तिच्या या फोटोला आतापर्यंत एक लाखापेक्षा जास्तवेळा पसंत करण्यात आले आहे. फॅन्स यावर खुप प्रतिक्रिया देत आहेत आणि अलायाला विचारत आहेत, तिचा रोमियो कोन आहे?

अलाया एफ सैफ अली खान सोबत
अभिनेत्री पूजा बेदीची मुलगी, अलायाने यावर्षीच्या सुरूवातीला ’जवानी जानेमन’ पासून बॉलीवुडमध्ये सुरुवात केली आहे. निर्माता जे. शेवकरमणी यांच्यासोबत तिचा तीन चित्रपटांचा करार आहे. अलाया एफने नितिन कक्कडचा चित्रपट ’जवानी जानेमन’ मधून हिंदी फिल्म इंडस्ट्रीमध्ये डेब्यू केला आहे. या चित्रपटात अ‍ॅक्टर सैफ अली खान आणि अ‍ॅक्ट्रेस तब्बू दिसले होते. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर जास्त कमाल दाखवू शकला नव्हता, परंतु चित्रपटातील अलायाच्या अभिनयाचे कौतूक झाले होते.