Alia Bhatt | आलियाला वाटत नाही तिची मुलगी व्हावी अभिनेत्री; राहा भविष्यात होणार…

पोलीसनामा ऑनलाइन – बॉलीवुडची क्युट अभिनेत्री आलिया भट्ट (Alia Bhatt) ही नेहमी चर्चेचा विषय असते. तिचा आगामी चित्रपट ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ (Rocky Aur Rani Ki Prem Kahani) हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटामध्ये ती रणवीर सिंग (Ranveer Singh) सोबत स्क्रीन शेअर करणार आहे. चित्रपटाचे जोरदार प्रमोशन सुरु आहे. दरम्यान एका कार्यक्रमामध्ये आलिया तिची मुलगी राहा कपूर (Raha Kapoor) हिच्या भविष्यातील प्रोफेशनबद्दल सांगते. आलियाला तिच्या मुलीने एक्ट्रर्स म्हणून काम करावे असे वाटत नाही तर दुसरे प्रोफेशन निवडावे असे वाटत आहे. याबद्दल तिने कार्यक्रमामध्ये सर्वासमोर सांगितले असून आलियाचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

https://www.instagram.com/p/CtoUNyPMQCy/?igshid=MzRlODBiNWFlZA==
https://www.instagram.com/p/CsGITajsBpG/?igshid=MzRlODBiNWFlZA==
https://www.instagram.com/p/CrvW2ruMuKx/?igshid=MzRlODBiNWFlZA==

अभिनेत्री आलिया भट्ट हिने अभिनेता रणबीर कपूरसोबत (Ranbir Kapoor) एप्रिल 2022 मध्ये लग्नगाठ बांधली. त्यानंतर 6 नोव्हेंबर 2022 रोजी गोंडस मुलीला जन्म दिला. या कपलने मुलीचे नाव ‘राहा’ असे ठेवले असून अनेकदा रणबीर व आलिया (Ranbir and Alia) आपल्या मुलीबद्दल गोष्टी शेअर करताना दिसतात. राहा कपूर बाबत आलियाला (Alia Bhatt Daughter) कार्यक्रमामध्ये प्रश्न विचारण्यात आला. यावेळी आलियाने तिने कोणते प्रोफेशन निवडावे हे सांगितले. अभिनेत्री आलिया भट्टला तिची मुलगी राहा हिने शास्त्रज्ञ व्हावे असे वाटते. आलियचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे ज्यामध्ये आलिया सांगते की, मी राहाकडे बघून सारखी म्हणते की तू तर साइंटिस्ट होणार. आलियाची ही व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

https://www.instagram.com/p/Crgfws9sU40/?igshid=MzRlODBiNWFlZA==
https://www.instagram.com/p/CqdMWQAsvD6/?igshid=MzRlODBiNWFlZA==
https://www.instagram.com/p/CqgBDwkP_OS/?igshid=MzRlODBiNWFlZA==
https://www.instagram.com/p/Cu3gbQcMrDU/?igshid=MzRlODBiNWFlZA==
https://www.instagram.com/p/CsF_v44IXyc/?igshid=MzRlODBiNWFlZA==

Alia Bhatt

अभिनेत्री आलिया भट्ट (Alia Bhatt) हिने राहाच्या जन्मानंतर अगदी काही महिन्यांमध्ये कामास सुरुवात केली.
अनेकांनी तिच्या मेहनतीचे कौतुक केले आहे. तिचा ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. यामध्ये ती आणि रणवीर सिंग स्क्रीन शेअर करताना दिसमार आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन करण जोहर (Karan Johar) याने केले आहे. यामध्ये धर्मेंद्र (Dharmendra), जया बच्चन (Jaya Bachchan) व शबाना आझमी (Shabana Azmi) यांसारख्या जेष्ठ कलाकार देखील काम करणार आहेत. ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ हा चित्रपट येत्या 28 जुलैला प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

Pune: CP Ritesh Kumar takes action against inter-district gang leader Amol Shelar and his three aides under MCOCA; CP has taken action against 38 gangs so far

Pune: Hadapsar Vidhan Sabha constituency initiate voter registration campaign in Housing Society on Saturday & Sunday