अभिनेत्री आलिया भट्ट आईची आठवण आल्यानंतर वाचते ‘हा’ खास MESSAGE !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – अभिनेत्री आलिया भट्ट अशी अ‍ॅक्ट्रेस आहे जी ऑन स्क्रीन आणि ऑफ स्क्रीन दोन्ही ठिकाणी आपल्या भावना व्यक्त करत असते. तिचं लेटेस्ट इंस्टाग्राम याचा पुरावा आहे. आलियाने एक नोट शेअर केली आहे जी तिची आई सोनी राजदानने लिहिली आहे.

ही नोट आलिया कुठेही जाताना आपल्या सोबत नेऊ शकते आणि आईची आठवण आल्यानंतर वाचू शकते. यात लिहिलं आहे की, “डार्लिंग आलिया हे तुझ्यासोबत ठेवण्यासाठी आहे. जेणेकरून तू हे वाचू शकशील आणि तुझ्या लक्षात राहो की, मी तुझ्यावर किती प्रेम करते.”

आलिया ही नोट शेअर करताना म्हणते, “One of those days where I miss my mother terribly and find this by my bedside!”

आलियाच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे झाले तर, अयान मुखर्जीच्या ब्रह्मास्त्र या सिनेमात ती दिसणार आहे. या सिनेमात तिच्यासोबत रणबीर कपूर असणार आणि बिग बी अमिताभ बच्चनही दिसणार आहेत. याशिवाय तिच्याकडे RRR आणि सडक हे सिनेमेदेखील आहेत.

 

Visit : Policenama.com