बिहारमध्ये झाला एलियन बेबीचा जन्म, आरोग्य कर्मचारी सुद्धा पाहून झाले हैराण; पाहण्यासाठी उसळली गर्दी, काही वेळानंतर सोडले प्राण

पाटणा : बिहारच्या गोपाळगंजमध्ये जन्माला आलेल्या एका विचित्र बालकाचा विषय सध्या खुपच चर्चेत आहे. बालकाच्या जन्मावेळी एकवेळ तर प्रसूती कक्षातील आरोग्य कर्मचारी सुद्धा त्याला पाहून घाबरले होते. येथे एका एलियन बेबीचा जन्म झाला. बालकाचे मोठे-मोठे डोळे तसेच शरीरावर एक वेगळ्याप्रकारचे सफेद आवरण पाहून आरोग्य कर्मचारी घाबरून गेले होते.

ही बातमी हॉस्पीटलमधून बाहेर पसरताच एलियन बेबीला पाहण्यासाठी लोकांची गर्दी उसळली होती. मात्र, काही तासातच या नवजात बालकाने जीव सोडला. मिळालेल्या माहितीनुसार गोपालगंज जिल्ह्याच्या साहिबा चक्र गावातील चुनचुन यादव यांच्या पत्नीने या विचित्र बालकाला जन्म दिला. यादव यांच्या गरोदर पत्नीला बुधवारी हॉस्पीटलमध्ये दाखल करण्यात आले होते. गुरूवारी सकाळी ती बाळंत झाली.

प्रसूतीनंतर जेव्हा डॉक्टरांनी आणि आरोग्य कर्मचार्‍यांनी नवजात बालकाला पाहिले तेव्हा त्यांना धक्काच बसला. बालकाचे दोन्ही डोळे मोठे-मोठे आणि लालसर होते. वरच्या जबड्यात मोठ्या माणसांसारखे दात होते. शरीराच्या त्वचेवर सफेद रंगाचे आवरण होते. ज्यांनी-ज्यांना त्यास पाहिले ते हैराण झाले. दूसर्‍या ग्रहावरून आलेला प्राणी आहे, असे अनेकांना वाटले. मात्र, या बालकाला जन्म देणार्‍या महिलेने याच्या दोन वर्षापूर्वी एक सामान्य बालकाला जन्म दिला होता. परंतु एक आठवड्यानंतर त्याचा मृत्यू झाला होता.

या विचित्र बालकाला जन्म देणारी महिला सुखरूप आहे. हॉस्पीटलमध्ये डॉक्टर तिच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून आहेत. डॉक्टरांनी सांगितले की, 10 लाख मुलांमध्ये एक असे असते. आई-वडीलांच्या जेनेटिक म्यूटेशनमुळे अशी बालके जन्माला येतात. अशी बालके जास्त दिवस जिवंत राहू शकत नाहीत. त्यांचे कमाल वय सात दिवस मानले जाते.