सरकारची मोठी घोषणा ! Ayushman Bharat योजनेच्या लाभार्थ्यांना फ्री मिळणार PVC कार्ड

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –   ‘आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना’अंतर्गत लाभार्थी आता त्यांचे पात्रता कार्ड (PVC)फ्रीमध्ये घेऊ शकतील. सरकारने कार्डवर लावण्यात येणाऱ्या 30 रुपयांचे शुल्क माफ केले आहे. यापूर्वी या कार्डसाठी शुल्क द्यावे लागत होते. पण आता हे शुल्क लाभार्थ्यांना ‘कॉमन सर्व्हिस सेंटर’वर देणे गरजेचे नाही.

सरकारने PVC कार्ड फ्रीमध्ये देण्याचा निर्णय घेतल्याने याचा मोठा फायदा होणार आहे. पण डुप्लिकेट कार्ड रिप्रिंट करण्यासाठी मात्र तुम्हाला 15 रुपयांचा टॅक्स सोडून CSC द्वारे शुल्क द्यावे लागणार आहे. ‘नॅशनल हेल्थ ऍथोरिटी’ने (NHA)’मिनिस्ट्री ऑफ इलेक्ट्रॉनिक्स अँड इन्फोर्मेशन टेक्नॉलॉजी’नुसार येणाऱ्या कॉमन सर्व्हिस सेंटर्सपासून (CSCs) एक सामंजस्य करार केला आहे. त्यामुळे लोकांना आता आयुष्मान भारत एंटाइटलमेंट कार्ड फ्रीमध्ये मिळणार आहे. या सामंजस्यानुसार आता लाभार्थ्यांना PVC आयुष्मान कार्ड मिळणार आहे. याचे डिलिव्हरीही सोपी होणार आहे.

योजनेचा लाभ घेण्यासाठी कार्ड गरजेचे नाही

‘आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजने’चा लाभ घेण्यासाठी हे कार्ड अनिवार्य नाही. मात्र, रुग्णांना आरोग्य सेवा कोणत्याही अडचणीविना मिळत राहावे आणि कोणत्याही प्रकारे फसवणूक थांबवण्यासाठी लाभार्थ्यांची ओळखीचा एक हिस्सा आहे.

देशात कुठूनंही होणार उपचार

लोकांना हे कार्ड मोफत मिळणार आहे. त्यामुळे याचा गरीबांना फायदा होणार आहे. या कार्डमुळे देशभरात कुठंही आणि कोणत्याही रुग्णालयात जाऊन मोफत उपचार करता येऊ शकतो.