पवना धरणाचे सर्व दरवाजे उघडले, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

पिंपरी : पोलिसनामा ऑनलाईन

पिंपरी – चिंचवड आणि मावळातील अनेक गावांना पाणी पुरवठा करणारे पवना धरण शंभर टक्केभरल्याने धरणाची सर्व धरणे उघडण्यात आली आहेत. सायंकाळपासून धरणातून 1500 ऐवजी विसर्ग वाढवून 2208 क्यूसेक्स या वेगाने नदीपात्रात पाणी सोडण्यास सुरुवात केली आहे. यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

पवना धरण ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात 100 टक्के भरले आहे. त्यामुळे शहरवासीयांसह मावळ परिसरातील नागरिकांचा वर्षभराचा पाण्याचा प्रश्न संपला आहे. एक जूनपासून 2265 मिमी पाऊस धरण परिसरात झाला आहे. गतवर्षी आजच्या तारखेला 2362 मिमी पाऊस झाला होता. धरणात 241 दक्षलक्ष घनमीटर एवढा उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे.
[amazon_link asins=’B00UFF422M’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’b4219ecd-9d8a-11e8-9445-2d6cd5c5158b’]

काही दिवस विश्रांती घेतल्यानंतर गेल्या दोन दिवसांपासून धरण परिसरात पुन्हा पावसाचा जोर वाढला आहे. त्यामुळे हायड्रो पॉवर आऊटलेटद्वारे दोन दिवसांपासून 800 क्यूसेक या वेगाने नदीत पाणी सोडण्यास सुरुवात केली होती. परंतु, पुन्हा पावसाचा जोर वाढल्याने आज सकाळपासून 1500 क्यूसेक्स या वेगाने नदीपात्रात पाणी सोडले जात होते. पावसाचा जोर वाढल्याने धरणात पाण्याचा येवा वाढला आहे. पाणीसाठा 100 टक्के झाल्यामुळे विसर्ग आता 1500 क्युसेकवरून सव्वाचार वाजल्यापासून 2208 क्युसेक्सपर्यंत वाढविण्यात आला आहे. पावसाची परिस्थती पाहून पाणी कमी-जास्त केले जाणार आहे, अशी माहिती शाखा अभियंता ए.एम.गदवाल यांनी दिली.