तुमच्या मुलाला किंवा जवळच्या कोणाला ‘पब्जी’चं वेड आहे ?, मग ही बातमी नक्‍की वाचा

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – आपण पब्जी या खेळाचे नाव ऐकलेच असेल. आजकालची मुले सर्वांच्या आहारी जात आहेत. काही मुले तर या खेळाच्या आधिन झाले आहेत. त्यांना याचे व्यसनच लागले आहे. त्यासाठी पालकांनी सावधगिरी बाळगायला हवी. तुमचा मुलगा किंवा मुलगी या खेळाच्या अधिक आहारी गेले नाहीना हे पाहिले पाहिजे. तसे असल्यास पालकांनी सावध राहणे गरजेचे आहे. खेळापासून मुलांना दूर ठेवले पाहिजे.

कारण या खेळांमुळे मुलांच्या शिक्षणावर परिणाम होत आहे. यामुळे मुले मानसिकदृष्ट्या कमकुवत बनत आहेत, हे पालकांनी लक्षात घेतले पाहिजे. याकारणांमुळे पालकही मुलांना डॉक्टरांकडे घेऊन जात आहेत. या मुलांमध्ये काही लोक असे आहेत जे डॉक्टरांच्या ओपीडीमध्येही १५ तासांहून अधिकवेळ पब्जी खेळतात. पब्जीमुळे अनेक घटना घडल्या आहेत.

एक विद्यार्थी पब्जीच्या एवढे आहारी गेली कि तिने चक्क आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. त्यानंतर पालकांनी तिला मानसिक रोगतज्ज्ञाकडे घेऊन नेले. सध्या तिच्यावर उपचार सुरु आहेत. तिला तिच्या रोजच्या आयुष्यात आणण्याचा प्रयत्न सुरु आहे. तर प्रतापगडमधील एक घटना अशी की तेथे राहणारे दोन सख्खे भाऊ एकत्र पब्जी खेळायचे. हे दोघे एवढे आहारी गेले होते की दोघे दिवसभरातील १० ते २० तास पब्जी खेळत होते. त्यांच्या वडिलांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी त्वरात मुलांना मानसोपचार तज्ञाकडे नेले आता ही मुले दिवसातून ५ तरी तास पब्जी खेळतात.

पब्जीच्या आहारी गेलेल्यांवर उपचार कसे करावेत?, हा प्रश्न सर्वच पालकांना पडलेला आहे.

मानसोपचार तज्ञ डॉ. राकेश पासवान यांनी यावर त्यांचे मत व्यक्त केले आहे. पब्जीच्या आहारी गेलेले मुलं हा खेळ न खेळता नाही राहू शकत. कितीही गर्दी असो किंवा गोंधळ असो ते या खेळात गुंग होतात. यावर उपचार म्हणजे दोनच पर्याय आहे. एक सायको थेरेपी आणि द्वितीय फार्मा थेरेपी. सायको थेरपीद्वारे त्या व्यक्तीला प्रत्यक्ष पद्धतीने नीट करण्याचा प्रयत्न करतो. अधिकतर सहभागींना फार्मा थेरेपीने उपचार केला जातो. अधिकच त्या खेळाच्या आहारी गेलेल्यांवर फार्मा थेरेपीनेच उपचार केले जातात, असंही त्यांनी यावेळी सांगितलं.

‘त्वचा’ होईल तजेलदार आणि वाढेल ‘डोळ्यां’ची क्षमता, दररोज ‘हे’ करा

पावसाळ्यात ‘मेकअप’ करताना ‘या’ गोष्टींची काळजी घ्या

तुमच्या ‘आयब्रो’ चा रंग अधिक डार्क करण्यासाठी वापरा ‘या’ टिप्स

‘गुळ’ या आजारांवर ठेवतो नियंत्रण

अर्थसंकल्प सादर केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ

कर्नाटकातील सन्नतीला बौद्ध क्षेत्र घोषित करावे

लोकांना मारहाण करण्यासाठी ‘जय श्री राम’च्या नाऱ्याचा वापर : अमर्त्य सेन

मराठा आरक्षणाला पुन्हा एकदा न्यायालयात आव्हान !