हिंदीसह इतर भारतीय भाषांमध्ये सुद्धा होईल इंजिनियरिंगचे शिक्षण, एआयसीटीईने (AICTE) दिली परवानगी

नवी दिल्ली – वृत्त संस्था  – इंजिनियरिंगचे शिक्षण आता हिंदीसह इतर सर्व भाषांमध्ये सुद्धा उपलब्ध होईल. अखिल भारतीय तंत्रज्ञान शिक्षण परिषद (AICTE) ने सध्या नवीन शैक्षणिक सत्रापासून हिंदीसह आठ भारतीय भाषांमध्ये हे शिक्षण घेण्याची परवानगी दिली आहे. येत्या काळात एआयसीटीईची योजना सुमारे 11 भारतीय भाषांमध्ये ते शिकवण्याची आहे. या दरम्यान, हिंदीसह हे ज्या इतर 7 भारतीय भाषांमध्ये शिकवण्याची मंजूरी देण्यात आली आहे, त्यामध्ये मराठी, बंगाली, तेलगु, तमिळ, गुजराती, कन्नड आणि मल्याळमचा समावेश आहे.

WTC 2021 फायनलच्या पूर्वी सरावाच्या मॅचमध्ये न्यूझीलँडने दाखवला ‘जोश’, टीम इंडियाला दिला ’इशारा’

 

नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरणात स्थानिक भाषांवर जोर
एआयसीटीईने ही सुरूवात अशा वेळी केली आहे जेव्हा, जर्मनी, रशिया, फ्रान्स, जपान आणि चीनसह जगातील अनेक देशांत पूर्ण शिक्षणच स्थानिक भाषांमध्ये दिले जात आहे. अलिकडेच देशात आलेल्या नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरणात सुद्धा स्थानिक भारतीय भाषांमधील शिक्षणावर जोर दिला आहे.

फॅफ ड्यू प्लेसिस अन् ख्रिस गेल यांनी घेतला महत्त्वाचा निर्णय ! जाणून घ्या कोणाचं वाढलं ‘टेन्शन’

 

ग्रामीण भागातील मुलांना होणार लाभ
सरकारचे म्हणणे आहे की, स्थानिक भाषांमध्ये शिकल्याने मुले सर्व विषय सहजपणे शिकू शकतात. तर इंग्रजी किंवा इतर भाषेतील शिकवण्याने त्यांना अडचणी येतात. या उपक्रमाने ग्रामीण आणि आदिवासी क्षेत्रांतील मुलांना जास्त लाभ होइृल, कारण सध्याच्या काळात हे शिक्षण इंग्रजीत असल्याने ते मागे पडत आहेत.

Rape Case : तरुणीवर रेप करून व्हिडिओ बनवणार्‍या पाचही आरोपींना अटक, पैशांच्या वादानंतर केला लैंगिक छळ

 

11 स्थानिक भाषांमध्ये सुद्धा कोर्स
एआयसीटीईचे चेयरमन प्रोफेसर अनिल सहस्रबुद्धे यांच्यानुसार, नवीन राष्ट्रीय धोरणाच्या शिफारसींना पुढे नेत हा उप्रकम सुरू केला आहे. सध्या तर केवळ हिंदीसह आठ स्थानिक भाषांमध्ये शिकण्याची परवानगी दिली आहे. आगामी काळात 11 स्थानिक भाषांमध्ये इंजिनियरिंगचे शिक्षण घेण्याची सुविधा असेल.

भारतात कोरोनामुळे 40 लाख मृत्यू झाल्याचा ‘न्यूयॉर्क टाइम्स’चा अहवाल ‘निराधार’

 

14 इंजिनियरिंग कॉलेजने मागितली परवानगी
प्रोफेसर सहस्रबुद्धे यांच्यानुसार आतापर्यंत 14 इंजिनियरिंग कॉलेजांनी हिंदीसह पाच स्थानिक भाषांमध्ये शिकवण्याची परवानगी मागितली आहे, जिथे आम्ही हे सुरू करणार आहोत. अभ्यासक्रम या सर्व भाषांमध्ये तयार करण्याचे काम सुरू केले आहे. सर्वप्रथम फर्स्ट ईयरच कोर्स तयार केला जाईल. त्यांनी म्हटले की, इंजिनियरिंगचे शिक्षण हिंदीत मिळण्याची मागणी मागील अनेक वर्षापासून काही संस्थांकडून केली जात होती.

योगगुरु बाबा रामदेव यांच्या अडचणीत वाढ, इंडियन मेडिकल असोसिएशनने (IMA) दाखल केली तक्रार

साफ्टवेयरच्या मदतीने तयार केला जात आहे कोर्स
एआयसीटीईने हिंदीसह आठ स्थानिक भारतीय भाषांमध्ये इंजिनियरिंग कोर्स सुरू करण्याच्या परवानगीसह या सर्व भाषांमध्ये पाठ्यक्रम तयार करण्याचे काम सुद्धा सुरू केले आहे. सध्या यासाठी साफ्टवेयरची मदत घेतली जात आहे, जे 22 भारतीय भाषांमध्ये भाषांतर करण्यास सक्षम आहे. याच्या मदतीने इंग्रजीतील अभ्यासक्रमाचे वेगाने भाषांतर करता येऊ शकते. एआयसीटीईने नुकतेच आपल्यासाठी हे साफ्टवेयर तयार केले आहे.

READ ALSO THIS :

श्वासासंबंधित आजारांसाठी दंडासन आहे एक वरदान, हे कसं करावं ते जाणून घ्या

‘भू-नमन’ आसन करून सुधारा पचनशक्ती, इम्युनिटी देखील वाढेल

 

रिसर्च : वजन कमी करण्यासाठी कधी आणि किती चालायचं ते जाणून घ्या

 

‘विपरीत-करणी’ डायबिटीजच्या रूग्णांसाठी वरदान, जाणून घ्या पद्धत