तुमच्या मोबाईलमध्ये सरकारची ही 5 App असतील तर ‘या’ समस्यातून होईल तात्काळ सुटका, जाणून घ्या

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –   सध्याच्या स्मार्टफोनच्या युगात अनेक कामे झटपट होतात. फक्त एका टचमध्ये आपल्याला अनेक कामे करता येऊ शकतात. याचा फायदाही सरकारी कामांमध्येही होत असतो. मात्र, तुमच्या स्मार्टफोनमध्ये त्याप्रकारचे अ‍ॅप्स असणे गरजेचे आहे. ते असल्यास तुमची होणारी अडचण टाळता येऊ शकते. त्याचा तुम्हाला फायदा होऊ शकतो.

डिजिलॉकर अ‍ॅप, मायगोव्ह अ‍ॅप, एम परिवहन अ‍ॅप यांसारख्या ऍपचा तुम्हाला मोठा फायदा होऊ शकेल. या ऍपबद्दल आपण जाणून घेणार आहोत…

डिजीलॉकर अ‍ॅप (Digilocker App) :  केंद्र सरकारने विशेष Digilocker App सुरु केले आहे. याचा फायदा वाढत्या डेटा लीक होणे आणि गोपनीयता प्रकरण टाळण्यासाठी होऊ शकतो. या अ‍ॅपमध्ये आपण आपल्या सर्व महत्वाच्या कागदपत्रांची डिजिटल प्रत ठेवू शकतो.

आरोग्य सेतु (Arogya Setu) :  देशासह जगभरात कोरोना व्हायरसचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढत आहे. कोरोना व्हायरस संसर्गासंबंधी आरोग्य सेतु हे सर्वात फायद्याचे ठरत आहे. या अ‍ॅपच्या माध्यमातून आपल्या कुटुंबातील सदस्यांसाठी लसीकरणासाठी अपॉइंटमेंट सहज मिळवू शकता. तसेच कोणत्याही शासकीय आवारात प्रवेश करण्यासाठी ते बंधनकारक आहे.

एम-परिवहन अ‍ॅप (mParivahan App) :  mParivahan App या अ‍ॅपच्या मदतीने आपणास आपल्या कारची आणि बाईकची माहिती कळू शकेल. तसेच या अ‍ॅपमध्ये आपण आपली कार किंवा बाईकची आवश्यक कागदपत्रे ठेवू शकता. या ऍपला सरकारकडून मान्यता असल्याने हीच कागदपत्रे अधिकृत म्हणूनही ग्राह्य धरता येऊ शकतात.

मायगोव्ह अ‍ॅप (MyGov App) :  MyGov App या अ‍ॅपमध्ये सरकारी विभागांची माहिती उपलब्ध आहे. तसेच, कोणत्याही सरकारी कामासाठी आवश्यक असलेली माहितीही या अ‍ॅपच्या माध्यमातून उपलब्ध आहे.

उमंग अ‍ॅप (Umang App) :   Umang App या अ‍ॅपमध्ये अर्थ, आरोग्य सेवा आणि गृहनिर्माण यासंबंधित माहिती मिळू शकेल. याशिवाय आपल्याला पीएफशी संबंधित माहितीही येथे उपलब्ध आहे. तसेच या अ‍ॅपमध्ये शासनाकडून देण्यात आलेल्या आर्थिक मदतीची माहितीही उपलब्ध आहे.