‘न्यूड सीन’ असलेला अमाला पॉलचा सिनेमा ऑनलाईन ‘लीक’ !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – अभिनेत्री अमाला पॉल स्टारर आदाई हा सिनेमा गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असल्याचे दिसत आहे. हा सिनेमा अनेक गोष्टींमुळे वादाचा विषय ठरला. हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या सिनेमाची एचडी प्रिंट पायरसी साईटवर लीक झाल्याचे समोर आले आहे. सध्या आदाई हा सिनेमा चांगली कमाई करत असताना लीक झाल्याने या सिनेमाच्या कलेक्शनवर त्याचा परिणाम होण्याची दाट शक्यता आहे.

एक थ्रिलर ड्रामा असणारा आदाई हा सिनेमा रत्ना कुमार यांनी डायरेक्ट केला आहे. विजी सुब्रमन्यम आणि व्ही स्टुडिओजने हा सिनेमा प्रोड्युस केला आहे. काही दिवसांपूर्वी आलेल्या या सिनेमाच्या टीजरलाही प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला होता. या सिनेमात अमालाचा न्यूड सीन आहे. टीजरनंतर या सिनेमातील या न्यूड सीनची खूप चर्चा होताना दिसून आली.

या सिनेमाची कथा कामिनी नावाच्या मुलीभोवती फिरताना दिसते. सिनेमात दिसतं की, ऑफिस पार्टीत एक घटना घडते. यानंतर तिचं आयुष्य बदलून जातं. सिनेमाला प्रेक्षकांचं भरभरून प्रेम मिळत आहे. परंतु अशातच हा सिनेमा ऑनलाईन साईटवर लीक झाला आहे. पिंकव्हिलाने याबाबत रिपोर्ट दिला आहे.

अमाला पॉलने या सिनेमात बलात्कार पीडीतेची भूमिका साकारली आहे. स्क्रिप्टची डिमांड असल्याने तिने या सिनेमात तिने न्यूड सीन दिला आहे. तिच्या न्यूड सीनची सोशलवर खूप चर्चा झाली होती. काहींनी अमालाला न्यूड सीनमुळे ट्रोल केले. काहींनी यावेळी पुढे येऊन अमालाचे कौतुक केले. यात सेलेब्रिटींचाही समावेश आहे.

आरोग्यविषयक वृत्त –