Amazon Great Indian Festival : ‘या’ 10 स्मार्टफोन्सवर बंपर सूट, जाणून घ्या ऑफर्स

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  Amazon Great Indian Festival ची सुरुवात आजपासून प्राईम मेंबर्स साठी तर उद्यापासून सर्व ग्राहकांसाठी सुरु होणार आहे. या वर्षीच्या सेलमध्ये स्मार्टफोनवर मोठ्या प्रमाणात सूट दिली जाणार आहे. तद्वतच सॅमसंग, वनप्लस, अँपल, जेबीएल, ओप्पो, शाओमी, ऑनर, पॅनासोनिक, रियलमी सोबत अनेक मोठ्या ब्रँडचे ९०० हुन अधिक प्रॉडक्ट या सेलमध्ये लाँच होणार आहेत. एचडीएफसी बँकेच्या क्रेडिट आणि डेबिट कार्ड च्या माध्यमातून खरेदी केल्यास १० टक्के सूट देखील मिळणार आहे.

ॲमेझॉनवर सूट मिळत असलेले टॉप १० स्मार्टफोन्स

>> iPhone 11
बाजारात या आयफोनची किंमत ६८ हजार ३०० रुपये असून, अॅमेझॉन सेलमध्ये हा स्मार्टफोन ४७ हजार ९९ रुपयांना मिळणार आहे.

>> OnePlus 8 5G
वनप्लस ८ 5G या फोनवर ५ हजार रुपयांपर्यंत सूट देण्यात आली असून, तो ग्राहकांना ३९ हजार ९९ रुपयांना खरेदी करता येईल. तसेच या फोनवर नो कॉस्ट ईएमआयचा पर्याय देण्यात आला आहे.

>> Redmi Note 9 Pro
रेडमी नोट ९ प्रो या स्मार्टफोनची किंमतीत कपात करुन १६ हजार ९९९ रुपयांऐवजी १२ हजार ९९९ रुपयांत खरेदी करता येईल. पहिल्यांदाच या स्मार्टफोनच्या किंमतीत कपात करण्यात आली आहे. तसेच फोनला ६ महिन्याचा नो कॉस्ट ईएमआयवर खरेदी करता येणार आहे.

>> Samsung Galaxy M31s
हा स्मार्टफोन २२ हजार ९९९ रुपयांऐवजी केवळ १८ हजार ४९९ रुपयांना मिळणार आहे. ग्राहकांना ६ महिन्याच्या नो कॉस्ट ईएमआयवर हा फोन खरेदी करता येवू शकतो.

>> Redmi Note 9
रेडमी नोट ९ स्मार्टफोन या सेलमध्ये १४ हजार ९९९ रुपयांऐवजी १० हजार ९९९ रुपयांत खरेदी करता येणार आहे.

>> Oppo A52 6GB
या फोनवर ६ हजार रुपयांची सूट देण्यात आली असून, हा फोन १३ हजार ९९० रुपयांना मिळणार आहे. हा फोन ९ महिन्याच्या नो कॉस्ट ईएमआयवर खरेदी करता येईल.

>> iPhone 7
हा स्मार्टफोन आजवर च्या सर्वात कमी किंमतींमध्ये म्हणजेच २४ हजार ९९९ रुपयांना मिळणार आहे.

>> Samsung Galaxy Note 10 Lite
या सेलमध्ये गॅलेक्सी नोट १० स्मार्टफोन ४३ हजार रुपयांऐवजी ३७ हजार ९९९ रुपयांत खरेदी करता येईल.

>> Mi 10 5G
Mi 10 5G फोन ५४ हजार रुपयांऐवजी ४४ हजार ९९९ रुपयांत खरेदी करता येईल. तसेच ग्राहकांना एक हजार रुपयांचा अतिरिक्त डिस्काउंट मिळणार आहे, व १२ महिन्याच्या नो कॉस्ट ईएमआय वर खरेदी करता येवू शकतो.

>> Oppo Reno3 Pro
या स्मार्टफोनची किंमत ३५ हजार ९९० रुपये असून, सेलमध्ये हा २५ हजार ९९० रुपयांना मिळणार आहे. हा स्मार्टफोनला ९ महिन्याच्या नो कॉस्ट ईएमआयवर खरेदी करता येईल.