Ambadas Danve | अंबादास दानवेंचा भुजबळांवर थेट आरोप, जरांगेंचे आंदोलन बदनाम करण्याचा ‘हा’ प्रयत्न

नागपूर : Ambadas Danve | राज्याचे कॅबिनेट मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) हे हिवाळी अधिवेशनात सुद्धा मराठा आरक्षण (Maratha Reservation) आंदोलनाचे नेते मनोज जरांगे (Manoj Jarange Patil) यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न करत आहेत. यापूर्वी त्यांनी ठिकठिकाणी सभा घेऊन मराठा आरक्षण आणि मनोज जरांगे यांना विरोध केला आहे. यामुळे एकीकडे भुजबळ विरूद्ध जरांगे असा वाद सातत्याने होत असताना दुसरीकडे मराठा विरूद्ध ओबीसी असे चित्र निर्माण झाले आहे. याबाबत आज विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी भुजबळ हे जरांगे यांचे आंदोलन बदनाम करण्यासाठी हे सर्व करत असल्याचा थेट आरोप केला आहे.

अंबादास दानवे म्हणाले, महाराष्ट्र सरकारचे एक मंत्री समाजात तेढ निर्माण करणारी वक्तव्ये सातत्याने करत आहेत. त्यांना कुणी धमकी देत असेल किंवा कुणी त्यांना गोळ्या घालणार असेल तर त्यांनी रितसर तक्रार करावी. कॅबिनेट मंत्री आहेत, त्यांनी गृहमंत्र्यांना भेटले पाहिजे. पोलीस स्टेशनला तक्रार दिली पाहिजे. मात्र मराठा समाजाच्या आंदोलकाविरोधात भूमिका मांडून आंदोलन बदनाम करण्याचा प्रयत्न त्यांनी करु नये.

अंबादास दानवे (Ambadas Danve) म्हणाले, वर्तमान पत्रात बातम्या येतात, आरक्षणासाठी धमक्या दिल्या जात
आहेत असे सांगितले जात आहे. स्वतःचे महत्व वाढवण्यासाठी हे मंत्री अशा प्रकारच्या गोष्टी करत आहेत.
जर मंत्र्यांनाच धमक्या येत असतील तर सामान्य माणसाचे काय?

अंबादास दानवे यांनी मागणी केली की, कॅबिनेट मंत्र्याला धमकी येत असेल तर या विषयावर चर्चा झाली पाहिजे.
तसे होणार नसेल तर हे मंत्री मराठा समाजाचे आंदोलन बदनाम करण्यासाठी या सगळ्या गोष्टी करत आहेत का?
याचीही चौकशी झाली पाहिजे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

पार्सल तर मिळालेच नाही पण खात्यातून गेले पाच लाख, आंबेगाव येथील घटना

Pune Police MPDA Action | पुण्यातील अट्टल गुन्हेगारावर एमपीडीएची कारवाई! पोलीस आयुक्त रितेश कुमार यांच्याकडून 69 वी स्थानबध्दतेची कारवाई

कामावरुन काढून टाकल्याच्या कारणावरुन ऑफिसची तोडफोड, हडपसर येथील घटना