Ameesha Patel | अमिषा पटेलने बॉलीवुड इंडस्ट्रीमध्ये काम करणे का थांबवले याचे दिले स्पष्ट उत्तर

पोलीसनामा ऑनलाइन – तब्बल 21 वर्षांनंतर सकिना व तारा सिंग (Sakina And Tara Singh) यांची हिट जोडी पुन्हा एकदा पडद्यावर येणार आहे. अभिनेता सनी देओल (Sunny Deol) व अभिनेत्री अमिषा पटेल (Ameesha Patel) हे ‘गदर 2’ च्या निमित्ताने पुन्हा एकदा स्क्रीन शेअर करताना दिसणार आहेत. प्रेक्षकांना देखील ‘गदर 2’ (Gadar 2) चित्रपटाची उत्सुकता लागली असून अमिषा व सनी दोघे चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करत आहेत. दरम्यान एका मुलाखतीमध्ये अभिनेत्री अमिषा पटेल हिने बॉलीवुडमध्ये काम करणे का थांबवले याचे कारण सांगितले आहे. बॉलीवुडने (Bollywood News) चांगले सिनेमे बनवणे आता सोडून दिले आहे असे मत अभिनेत्री अमिषा पटेलने मांड़ले आहे.

 

 

 

एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये अभिनेत्री अमिषा पटेल हिला अनेक वर्षे चित्रपटामध्ये काम का केले नाही याबद्दल विचारण्यात आले. यावेळी अमिषाने उत्तर दिले की, बॉलीवुड चित्रपट बनवणे विसरले आहे. भूल भुलैया (Bhool Bhulaiya), हमराज (Hamraj) व हनीमून ट्रॅव्हल (Honeymoon Travel) या चित्रपटांच्या दर्जाचे चित्रपट बनवणे अवघड आहे. हनिमून ट्रॅव्हल प्रायव्हेट लिमिटेड सारखे चित्रपट आता अजिबात बनवले नाहीत. आता फरहान अख्तर (Farhan Akhtar) त्यांच्या प्रोडक्शन हाऊसमधून एका नव्या पद्धतीच्या सिनेमाची सुरुवात करत आहे. असे मत अभिनेत्री अमिषा पटेल हिने नोंदवले आहे.

 

 

बॉलीवुड सिनेमांबद्दल बोलताना अभिनेत्री अमिषा पटेल म्हणाली की,
आजच्या काळात चित्रपटाची कथा चांगल्या प्रकारची लिहिली जात नाही.
मागच्या काही वर्षात बॉलीवुडमध्ये असे काही चित्रपट बनवण्यात आले आहेत जे प्रेक्षकांच्या दीर्घकाळ लक्षात राहणार नाहीत.
फक्त मीच नाही तर इतर कलाकारांना देखील वेगळे काहीतरी करण्याची, वेगळी भूमिका साकारण्याची इच्छा आहे मात्र सध्या काळात ते शक्य नाही.

 

 

पुढे ती म्हणाली की, मी नेहमी जोखीम व चॅलेंज स्वीकारले आहेत. कर्मशियल चित्रपट तर मी केले पण माझी भूमिका ही नेहमी हटके असायची. मला अशी आशा आहे की ‘गदर 2’ चित्रपटानंतर मला चांगल्या चित्रपटाच्या ऑफर येतील.

 

 

अभिनेत्री अमिषा पटेल ही अनेक वर्षांनंतर चित्रपटामध्ये दिसून येणार आहे.
तिची ‘गदर 2’ चित्रपट येत्या 11 ऑगस्टला प्रेक्षकांच्या (Gadar 2 Release Date) भेटीस येणार आहे
. चित्रपटाबरोबरच अमिषा तिच्या वक्तव्यांमुळे देखील चर्चेत राहिली आहे.
काही दिवसांपूर्वी अमिषाने (Ameesha Patel) ‘गदर 2’ च्या निर्मात्यांवर पगार थकवल्याचा आरोप केला होता.

 

 

Web Title : Ameesha Patel | ameesha patel reveals what keeps her away from bollywood says post gadar 2 lots of good opportunities

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा