MNS Chief Raj Thackeray | ‘…तर राजकारणासाठी मी नालायक’, राज ठाकरेंचे भाष्य

दापोली : पोलीसनामा ऑनलाइन – शिवसेना (Shivsena) आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (NCP) बंडखोरी झाल्यानंतर राज्यातील राजकारणात नाट्यमय (Maharashtra Political News) घडामोडी घडत आहेत. या पार्श्वभूमीवर मनसे प्रमुख राज ठाकरे (MNS Chief Raj Thackeray) यांनी पक्षबांधणी सुरु केली आहे. राज ठाकरे (MNS Chief Raj Thackeray) सध्या कोकण दौऱ्यावर असून त्यांनी राज्यात घडत असलेल्या घडामोडींवर भाष्य केलं आहे. राजकारणात मी असा व्यभिचार करणार नाही, असे गुरुवारी (दि.13) त्यांनी म्हटलं होतं. त्यानंतर आजही त्यांनी याबाबत वक्तव्य केलं आहे. ते आज दापोलीत पत्रकार परिषदेत बोलत होते.

 

राज ठाकरे (MNS Chief Raj Thackeray) म्हणाले, या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर हा कोकण दौरा (Kokan Daura) नियोजित केलेला नाही. त्याआधीच हा कोकण दौरा ठरलेला होता. पक्षसंघटनेत काही बदल करायचे होते ते बदल झाले आहेत. या बैठकांमधून आता कामाला लागा अशा सूचना कार्य़कर्ते आणि पदाधिकऱ्यांना दिल्या आहेत.

 

युतीच्या चर्चांना पूर्णविराम

मनसे नेते आणि कार्य़कर्ते उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि राज ठाकरे यांनी एकत्र यावं असं आवाहन करत आहेत. तसे बॅनरही शिवसेना भवनाच्या (Shiv Sena Bhawan) समोर लावण्यात आले आहेत. तुम्ही उद्धव ठाकरे यांच्यासोबत युती करणार का? असा प्रश्न पत्रकार परिषदेमध्ये राज ठाकरे यांना विचारण्यात आला. यावर बोलताना राज ठाकरे यांनी आपण कोणाशी युती करणार नसल्याचे सांगत युतीच्या चर्चांना पूर्णविराम दिला. महाराष्ट्रात जे काही सुरु आहे, ते पाहता मी कोणाशीही युती करने असे वाटत नाही, असे राज ठाकरे म्हणाले.

 

तर मी राजकारणासाठी नालायक

निवडणुकीच्या आधी कोणाबरोबर युती करतात, मग निकाल लागल्यानंतर कोणाबरोबर जाता? मतदारांची अशी प्रतारणा माझ्याकडून होणार नाही. सगळे असंच करायला लागले तर महाराष्ट्राला भवितव्यच उरणार नाही. असं व्यभिचारी राजकारण मी करणार नाही. मला जमत नाही. याला राजकारण म्हणत असतील तर मी त्या राजकारणासाठी नालायक आहे, असं राज ठाकरे म्हणाले. तसेच दोन, तीन वर्ष निवडणुका प्रलंबित राहतात आणि त्यावर कोणी काही बोलत नाही. नुसती चालढकल सुरु आहे, अशी खंत देखील त्यांनी व्यक्त केली.

 

राज ठाकरेंची एकला चलोची भूमिका

पूर्वी लोक राग व्यक्त करण्यासाठी रस्त्यावर यायचे. पण आता मोबाईलवरुन राग व्यक्त करतात
आणि शांत होतात. त्या मोबाईल फोनवरील प्रतिक्रिया राजकारणी पाहत नाहीत.
शांत जनता पाहतात, ज्यांनी राग व्यक्त करुन झालेला असतो, असंही ते म्हणाले. दरम्यान,
लोकसभा (Lok Sabha) आणि विधानसभा निवडणुकांसाठी (Assembly Elections)
महाराष्ट्र नवनिर्माण सेना उमेदवार जाहीर करणार असल्याचे राज ठाकरे यांनी स्पष्ट केले.
या निवडणुकीत एकला चलोची भूमिका घेणार असल्याचे सांगत निवडणुकांची तयारीही सुरु झाली असल्याचे राज ठाकरे यांनी सांगितले.

 

 

Web Title : MNS Chief Raj Thackeray | then i am worthless for politics raj thackerays statement

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा