Pune News | चौथी खुली राज्यस्तरीय तायक्वांदो स्पर्धेमध्ये चॅम्पियन, आय के के बी, ऍथलिट, ओरिएंटचे यश

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune News | रॉयल तायक्वांदो अकॅडमी अंतर्गत चौथी खुली राज्यस्तरीय स्पर्धा 9 जुलै रोजी घेण्यात आली. स्पर्धेमध्ये एकूण 580 खेळाडूंनी भाग घेतला होता. पुणे, मुंबई, नगर, खेड, सोलापुर, बारामती येथील खेळाडूंनी सहभाग घेतला होता. (Pune News)

 

स्पर्धेचे उद्घाटन समारंभ राष्ट्रीय मेडलिस्ट दीपक गायकवाड, उमेश कोलेकर, दत्तात्रय थोपटे, प्रशांत भंडारी यांच्या हस्ते करण्यात आले. स्पर्धेचे आयोजन मुनावर शेख, गणेश पवार, विशाल घोगरे, सलीम शेख, अशोक बनसोडे, सागर माने, भरत व्यवहारे यांनी उत्तम रितीने पार पाडले. (Pune News)

 

स्पर्धेचे पहिले क्रमांक चॅम्पियन स्पोर्ट्स क्लब, दुसरा क्रमांक आय के के बी, तिसरा क्रमांक ऍथलेट अकॅडमी तर चौथा क्रमांक ओरिएंट अकॅडमी यांनी पटकाविला.

पुढील खेळाडूंनी आपल्या आपल्या वजन गटांमध्ये सुवर्णपदकाची कामगिरी केली.
अथर्व उपाध्यय, रायन अहमद, ईश्वरी मालसुरे, श्रेया गोगावले, अनुराग गायकवाड,
विक्रांत गायकवाड, मैथली चव्हाण, समृद्धी नायझीरकर, रेहान शेख, लवेश विश्वकर्मा, श्रीजा आचार्य, वृंदा घाघड, अथर्व राऊत, लक्ष लड्डा.

रॉयल तायक्वांदो संस्थेचे अध्यक्ष मुनावर शेख यांनी सर्व पदक विजेत्यांचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीस साठी शुभेच्छा दिल्या आहेत.

 

 

Web Title : Pune News | Achievement of Champion, IKKB, Athlete, Orient in 4th Open State Level Taekwondo Tournament

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Pune Crime News | पतीच्या अंगावर उकळते पाणी टाकून पत्नीने केला जीवे मारण्याचा प्रयत्न; शिवणेमधील घटना,
भावाच्या सांगण्यावरुन केले कृत्य

Maharashtra Political Crisis | 16 आमदारांच्या अपात्रतेप्रकरणी अध्यक्ष राहुल नार्वेकरांना सुप्रीम कोर्टाची नोटीस,
उत्तर देण्यासाठी ‘इतक्या’ दिवसांची मुदत

Alia Bhatt | आलिया भट्टची पापाराझींसोबतची ‘ही’ कृती नेटकऱ्यांना भावली; व्हिडिओ व्हायरल