US : जाणीपूर्वक ऑफिसला गेला ‘कोरोना’ रूग्ण; 7 जणांचा झाला मृत्यू, 300 जणांना व्हावे लागले क्वारंटाइन

वॉशिंग्टन :वृत्तसंस्था – संपूर्ण जग सध्या कोरोना संसर्गासारख्या जीवघेण्या आजाराशी लढत आहे. या दरम्यान अमेरिकेचा एक दक्षिण ओरेगन समुदाय नुकताच कोरोना व्हायरसच्या प्रकोपाने हादरला आहे, ज्यामध्ये सात लोकांचा मृत्यू झाला आणि शेकडो लोकांना कोरोनाच्या संपर्कात आल्याने धोका निर्माण झाला आहे. तर सार्वजनिक आरोग्य अधिकार्‍यांच्या माहितीनुसार, एका आजारी व्यक्तीने ‘सुपर स्प्रेडर अ‍ॅक्शन‘ च्या माध्यमातून कोरोनाचा हा संसर्ग पसरवला आहे.

कोरोनाची लक्षणे असूनही गेला कामावर
डगलस काऊंटीच्या अधिकार्‍यांनी मागील आठवड्यात म्हटले होते की, एक व्यक्ती जाणीपूर्वक कोरोनाची लक्षणे असतानाही कामावर गेला होता. नंतर टेस्टमध्ये तो कोरोना पॉझिटिव्ह आढळला होता. काऊंटीत अलिकडचे दोन प्रकोप, जे मंगळवारी ओरेगोनियनद्वारे रिपोर्ट करण्यात आले होते, त्यानंतर त्या व्यक्तीला पुन्हा ट्रेस करण्यात आले होते, ज्यानंतर शेकडो काऊंटी वासीयांना क्वारंटाइन व्हावे लागले होते.

300 लोक झाले क्वारंटाइन
तर डगलस काऊंटीचे पब्लिक हेल्थ ऑफिसर बॉब डेनेन्होफर यांनी मागच्या गुरूवारी म्हटले होते की, त्या प्रकोपांमध्ये एकात 7 लोकांचा मृत्यू झाला आहे, आणि अन्य अलिकडच्या प्रकोपात 300 पेक्षा जास्त लोक किंवा कुटुंबियांना क्वारंटाइनमध्ये ठेवले आहे. आम्ही कल्पनाही करू शकत नाही की, या लोकांना आता किती पच्छाताप होत असेल, आम्ही त्यांन केवळ सहानुभूती दाखवू शकतो.

मात्र, सार्वजनिक आरोग्य अधिकार्‍याने त्या कार्यालयाच्या नावाचा खुलासा केला नाही, ज्या ठिकाणी प्रकोप सुरू झाला किंवा त्या व्यक्तीचे नाव सुद्धा सांगितले नाही ज्याने दुसर्‍यांना व्हायरस दिला आहे.

काऊंटीत आतापर्यंत 1,315 कोरोना प्रकरणे
काऊंटीत महामारी सुरू झाल्यानंतर आतापर्यंत 37 मृत्यू झाले आहेत. तसेच किमान 1,315 कोरोना संक्रमित प्रकरणे समोर आली आहे.