कोरोनाशी लढत असलेल्या भारतासाठी ब्रिटिश राजदूतांनी हिंदीमध्ये दिला मन जिंकणारा संदेश, पहा Video

नवी दिल्ली : वृत्त संस्था – भारतात सुरू असलेली कोरोनाची दुसरी लाट आणि सातत्याने होत असलेल्या मृत्यूंनी जगातील इतर देशांना सुद्धा चिंतेत टाकले आहे. या दरम्यान अनेक देशांनी मदतीचा हातसुद्धा पुढे केला आहे. याच पार्श्वभूमीवर ब्रिटनकडून सुद्धा आपली मदत भारताला पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

ब्रिटिश दुतावासाकडून सुद्धा समर्थन देण्यात आले आहे. ब्रिटिश दूतावासाकडून अतिशय वेगळ्याप्रकारे हिंदीत व्हिडिओ जारी करून सांगण्यात आले आहे की, कशाप्रकारे ब्रिटन भारताची मदत करत आहे.

जारी व्हिडिओमध्ये भारतातील ब्रिटिश राजदूत अलेक्स एलिस हिंदीत भारतासाठी मदतीची घोषणा करताना दिसत आहेत. व्हिडिओत ते म्हणत आहेत की, या कठिण काळात युके भारतासोबत आहे. पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी आज ऑक्सीजन कॉन्स्ट्रेटर्स आणि व्हेंटिलेटर्स भारताला पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. कोरोनाला पराभूत करण्याच्या या युद्धात युके भारतासोबत खांद्याला खांदा लावून पुढे जात आहे. धन्यवाद.

भारतात मागील सुमारे एक आठवड्यांपासून दररोज कोरोनाच्या 3 लाखांपेक्षा जास्त केस समोर येत आहेत. अचानक आलेल्या दुसर्‍या लाटेने भारतात आरोग्य यंत्रणेच्या समोर मोठे आव्हान उभे राहिले आहे. दिल्लीसह देशातील अनेक मोठ्या शहरांच्या हॉस्पिटलमध्ये सुद्धा ऑक्सीजन आणि व्हेंटिलेटर्सची टंचाई आहे.

सोमवारीच ब्रिटनकडून व्हेंटिलेटर आणि ऑक्सीजन कॉन्स्ट्रेटर्सचा पहिला साठा रवाना करण्यात आला होता. हा साठा मंगळवारी दिल्लीत पोहचला देखील आहे. पाठवण्यात आलेला पहिल्या साठ्यात 495 ऑक्सीजन कॉन्स्ट्रेटर्स, 120 नॉन-इंव्हेजिव्ह व्हेंटिलेटर आणि 20 मॅन्युअल व्हेंटिलेटरचा समावेश आहे.