Coronavirus : जगातील ‘या’ 8 देशातील कोरोनाचे 100 हून जास्त रूग्ण मात्र एकही मृत्यू नाही

नवी दिल्ली :  वृत्तसंस्था –  जगभरात कोरोनामुळे 20 लाखा पेक्षा अधिक जणांना संसर्ग झाला आहे. तर 1 लाखापेक्षा अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. जगभरात कोरोना संक्रमणाची प्रकरणे दिवसेंदिवस वाढत असताना मृतांचा आकडा देखील दिवसेंदिवस वाढत आहे. भारतात देखील लॉकडाऊन असतानाही देशात कोरोना व्हायरसची प्रकरणे दिवसेंदिवस आढळून येत आहेत. देशात 11 हजार पेक्षा अधिक लोकांना संक्रमण झाले आहे तर 350 पेक्षा अधिक जणांचा मृत्यू झाला आहे.

कोरोना व्हायरसमुळे संपूर्ण जगभरात कहर उडाला आहे. परंतु जगाच्या नकाशामध्ये असे काही देश आहेत ज्या देशात कोरोनामुळे एकाही व्यक्तीचा मृत्यू झालेला नाही. हे असे देश आहेत जिथे कोरोनाशी लढा देण्यास आरोग्याच्या सुविधा अत्यंत मर्यादित आहेत. कोरोनामुळे विकसीत देशांची आरोग्य यंत्रणा हतबल झाली असताना या देशांना कोरोनावर मात करण्यात यश आले आहे.
कोरोनाचा फैलाव जगभरातील 200 पेक्षा अधिक देशांमध्ये झाला आहे. जगात अशी काही देश आहेत ज्या

ठिकाणी कोरोनाची 100 पेक्षा अधिक प्रकरणे आढळून आली आहे मात्र एकही मृत्यू झालेला नाही. कोणत्या देशात कोरोनाचा फैलाव झाला परंतु त्या ठिकाणी एकही मृत्यू झाला नाही असे काही देशांची माहिती देत आहोत.

कोरोनामुळे एकही मृत्यू झालेला नाही असे देश

रियुनियन बेट

पहीला रुग्ण – 11 मार्च रोजी आढळला
कोरोनाबाधित एकूण रुग्ण – 391
एकूण लोकसंख्या – 8.9 लाख

गिनी

पहिला रुग्ण 13 मार्चला आढळला
एकूण रुग्ण – 363
एकूण लोकसंख्या – 1.3 कोटी

व्हिएतनाम

23 जानेवारी रोजी पहिला रुग्ण आढळला
एकूण रुग्ण – 266
एकूण लोकसंख्या – 9.7 कोटी

फारो बेट

पहिला रुग्ण 4 मार्चला आढळला
एकूण रुग्ण – 184
एकूण लोकसंख्या – 48863

रुवांडा

पहिला रुग्ण 14 मार्चला आढळला
एकूण प्रकरणे 134
एकूण लोकसंख्या – 1.2 कोटी

जिब्राल्टर

पहिला रुग्ण 4 मार्चला आढळला
एकूण रुग्ण – 129
एकूण लोकसंख्या – 33693

कंबोडिया

पहिला रुग्ण 7 मार्चला आढळला
एकूण प्रकरणे – 122
एकूण लोकसंख्या – 1.6 कोटी

मेडागास्कर

पहिला रुग्ण 20 मार्चला आढळला
एकूण प्रकरणे – 108
एकूण लोकसंख्या – 2.7 कोटी

भारतातील या राज्यात कोरोनामुळे एकही मृत्यू नाही

जगामध्ये या देशांमध्ये कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 100 पेक्षा अधिक असली तरी एकही मृत्यू झाला नाही. त्याप्रमाणे भारतात देखील असे काही राज्य आहेत त्या राज्यात अद्याप कोरोनामुळे एकाही व्यक्तीचा मृत्यू झालेला नाही. या राज्यांमध्ये अंदमान निकोबार बेट, अरुणाचल प्रदेश, चंदीगड, छत्तीसगड, दादर आणि नगर हवेली, गोवा, लडाख, मणिपूर, मिझोरम, नागालँड, पुडुचेरी, त्रिपुरा, उत्तराखंड या राज्यात एकाही मृत्यू झालेला नाही.