अमित शहा यांना एमआयएम मुक्त नाही तर मु्स्लिम मुक्त देश हवा : असदुद्दीन ओवेसी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – तेलंगणा विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष अमित शहा यांना  एमआयएम मुक्त नाही तर  मुस्लिम मुक्त देश हवा आहे असे वक्तव्य एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी केले आहे.

तेलंगणा मध्ये  येत्या ७ डिसेंबरला विधानसभा निवडणुकीचे मतदान होणार आहे. दरम्यान तेलंगणातील बहादुरपूर येथे एमआयएमची प्रचार सभा आयोजित करण्यात आली होती. यादरम्यान एमआयएम प्रमुख,  खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी भाजपावर टीकांचा वर्षाव केला दरम्यान ते म्हणाले की,  अमित शहा यांना  एमआयएम मुक्त नाही तर मु्स्लिम मुक्त देश हवा आहे. अमित शहा म्हणतात मजलिस मुक्त देश करायचे आहे, पण अमित शाह मजलिस मुक्त नव्हे तर मुसलमानांना पळवून लावू इच्छितात. परंतु  मुस्लिमांना या देशात राहण्याचा अधिकार भारतीय संविधानाने दिला आहे. असेही ते म्हंटले. इतकेच नव्हे तर भाजपा तेलंगणात काहीही करून विजय मिळवायचा प्रयत्न करत आहे. मात्र भाजपाला तेलंगणात यश मिळणार नाही.

विशेष म्हणजे भाजपसह कॉंग्रेस, तेलगू देसम या पक्षांवर पण ओवेसींनी केला. कॉंग्रेस, तेलगू देसम, आणि भाजपा यापैकी कोणाची सत्ता आल्यास तेलंगणाचे सरकार दिल्ली, आंध्र प्रदेश ,नागपूर येथून चालेल. असेही ते म्हंटले. इतकेच नव्हे तर “मेरे अंगने में तुम्हारा क्या काम है.” असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

तेलंगणा राज्यात सध्या टीआरएसची सत्ता आहे. विशेष म्हणजे आंध्र प्रदेश राज्यापासून वेगळ झाल्यानंतर तेलंगणात पहिल्यांदाच निवडणुका होत आहेत. या निवडणुकीत कॉंग्रेसने चंद्राबाबू नायडू यांचा पक्ष टीडीपीसह युती केली आहे. तसेच भाजपही मोठ्या ताकदीने मैदानात उतरला आहे.

विशेष म्हणजे  एमआयएमचेही काही ठिकाणी वर्चस्व आहे. सध्या तेलंगणा विधानसभेत एमआयएमचे सात आमदार आहेत. तेलंगणाच्या सर्व ११९ जागांसाठी ७ डिसेंबरला मतदान होणार आहे तर ११  डिसेंबरला मतमोजणी होईल.

Get real time updates directly on you device, subscribe now.

You might also like
WhatsApp WhatsApp us