भाजप अध्यक्ष अमित शहांच्या जीवाला धोका ?

नवी दिल्ली: वृत्तसंस्था

भाजपाध्यक्ष अमित शहा यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा उजवा हात समजला जाते. किंबहुना भाजपच्या कार्याचा जास्तीत जास्त भार अमित शहा यांच्या खांद्यावर आहे. असे असताना आता अमित शहा यांच्या जीवाला धोका असल्याचे सांगत त्यांच्या सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आली आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाने शहा यांना राष्ट्रपती आणि पंतप्रधानांसारखी सुरक्षा दिली असून त्यामुळे देशातील निवडक अति महत्त्वाच्या व्यक्तीच्या क्लबमध्ये त्यांचा समावेश झाला आहे.

अमित शहा अति महत्वाचे व्यक्ती….

अमित शहा यांना आतापर्यंत झेड प्लस सुरक्षा देण्यात आली होती. आता त्यांना राष्ट्रपती आणि पंतप्रधानांना देण्यात येणारी अॅडव्हान्स सिक्युरिटी लायझनिंग (एएसएल) सुरक्षा व्यवस्था पुरवण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वी गुप्तचर विभागाने (आयबी) शहा यांच्या सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेतला होता. शहा हे अति महत्त्वाचे व्यक्ती असून त्यांच्या जीवाला धोका असल्याचं आयबीनं केंद्रीय गृहमंत्रालयाला कळवलं होतं. तसेच शहा यांच्या सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्याची शिफारसही केली होती. त्यानंतर गृहमंत्रालयाने शहा यांना एएसएल सुरक्षा देण्याचा निर्णय घेतला. आता शहा यांना ज्या ठिकाणी जायचे आहे, त्या भागाची दोन आठवडे आधीच ही टीम पाहणी करेल आणि राज्यांना आणि पोलिसांना सुरक्षा नियमांचं पालन करण्याचे निर्देश देईल.

या आधीच शहा यांना चोवीस तासांसाठी सीआरपीएफचं सुरक्षा कवच देण्यात आलं आहे. या शिवाय त्यांना ३० कमांडोंचंही संरक्षण देण्यात आलेलं आहे. या व्यतिरिक्त राज्याच्या पोलिसांकडूनही त्यांना सुरक्षा पुरवली जाते. सध्या राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांना एएसएल टीमची सुरक्षा देण्यात आलेली आहे. या यादीत आता शहा यांचाही समावेश झाला आहे. ज्या व्यक्तीच्या जिवाला धोका असतो त्यांनाच ही सुरक्षा पुरवली जाते.

[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’9ed4fe00-c2e8-11e8-b5d4-959fbc326a15′]

अतिमहत्वाच्या व्यक्तींची यादी ज्यांना एएसएल टीमची सुरक्षा देण्यात आलेली आहे.

राष्ट्रपती रामनाथ कोविंद,

पंतप्रधान नरेंद्र मोदी

केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह

भाजप पक्षप्रमुख अमित शहा

यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षेतही वाढ करण्यात आली होती. आता अमित शहा यांच्या देखील सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आली आहे. त्यांना एएसएल टीमची सुरक्षा देण्यात आलेली आहे

[amazon_link asins=’B07DNS3KCB,B07437YHXP’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’4953d7d7-c2e9-11e8-a23c-5d3504ad65ad’]