Amitabh Bachchan | ‘घूमर’ चित्रपटातील अभिषेकच्या अभिनयासाठी बिग बी यांनी केली भावनिक पोस्ट

पोलीसनामा ऑनलाइन – Amitabh Bachchan | अभिनेता अभिषेक बच्चनचा (Abhishek Bachchan) ‘घूमर’ हा चित्रपट (Ghoomer Movie) बॉक्स ऑफिसवर रिलीज झाला आहे. अनेक वर्षांनंतर तो मोठ्या पडद्यावर झळकणार असल्यामुळे प्रेक्षक देखील उत्सुक आहे. ‘घूमर’ चित्रपटामध्ये अभिषेक सोबत अभिनेत्री सैयामी खेर (Saiyami Kher) आणि अंगद बेदी (Angad Bedi) हे कलाकार प्रमुख भूमिका साकारणार आहे. या चित्रपटाची कहानी हटके असल्याने चित्रपटाच्या ट्रेलरला प्रेक्षकांनी चांगला प्रतिसाद दिला होता. आता ‘घूमर’ या चित्रपटाबाबत आपल्या मुलाच्या अभिनयाबाबत अभिनेते अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांनी भावनिक पोस्ट शेअर केली आहे. सोशल मीडियावर अमिताभ बच्चन यांचे अभिषेक बच्चनवरील हे प्रेम पाहून नेटकरी देखील खूश झाले आहे.

‘घूमर’ या चित्रपटाची कहानी ही क्रिकेटच्या एका खेळाडूच्या आयुष्यावर व जिद्दीवर अवलंबून आहे. यामध्ये अभिषेक बच्चनने क्रिकेटरच्या कोचची भूमिका साकारली आहे. यावर आता अमिताभ बच्चन यांनी मुलाच्या या भूमिकेचे कौतुक केले असून चित्रपटाला शुभेच्छा दिल्या आहेत. अमिताभ बच्चन यांनी लिहिले आहे की, “अभिषेक मी हे एक वडील म्हणून म्हणून आणि आपण दोघे एकाच समुदायाचे सदस्य आहोत म्हणून सांगतो आहे की, तू या लहान वयामध्ये आणि या काळामध्ये एका मागून एका चित्रपटामध्ये दमदार व अवघड भूमिका साकारल्या आहेत. सर्व भूमिका या वेगवेगळ्या आशयाच्या आणि यशस्वी ठरत आहेत. बिग बी यांच्या या भावनिक पोस्टवर अनेकांनी कमेंट केल्या आहेत. तसेच त्यांच्या पोस्टवर अभिनेता अभिषेक बच्चन याने देखील रिप्लाय दिला आहे. अभिषेक बच्चन याने रिप्लाय देताना लिहिले आहे की, ‘लव्ह यू पा’ आणि रेड हार्ट इमोजी पोस्ट केला आहे.

सोशल मीडियावर अमिताभ- अभिषेक यांचे प्रेम पाहून नेटकरी देखील खूश झाले आहेत. या आधी देखील अमिताभ यांनी सांगितले की त्यांनी जेव्हा घूमर हा चित्रपट पाहिला होता तेव्हा त्यांचे डोळे पाणावले होते. ते म्हणाले की, “मी दोनदा घूमर पाहिला. एकदा रविवारी दुपारी आणि पुन्हा रात्री. हा अविश्वसनीय आहे आणि जेव्हा तुमचा मूलगा त्याचा एक भाग असेल तेव्हा तुम्ही त्याकडे डोळेझाक करू शकत नाही. हे पाहिल्यानंतर मी माझे विचार तुमच्याशी शेअर करू शकत नाही. माझे डोळे भरून आले आहेत. चित्रपटातील डायलॉग हे सर्वात शक्तिशाली शब्द आहेत. मला माहित आहे की हरलेल्याला काय वाटते, मला हे पहायचे आहे की विजेत्याला कसे वाटते.” असे मत अमिताभ बच्चन यांनी घूमर चित्रपट पाहून व्यक्त केले आहे.

अभिषेक बच्चनच्या या ‘घूमर’ चित्रपटाला प्रेक्षकांचा देखील चांगला प्रतिसाद मिळत आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन आर बल्की (R. Balki) यांनी केले असून यामध्ये बिग बी अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांनी देखील ‘घूमर’ चित्रपटामध्ये भूमिका साकारली आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

RBI UDGAM Portal | बॅंकेमध्ये दावा न केलेली रक्कम आता एकाच वेबसाईटवर पाहता येणार; आरबीआयने केले खास पोर्टल लॉन्च

Pune Crime News | अंमली पदार्थाची तस्करी करणाऱ्या 4 जणांना गुन्हे शाखेकडून अटक; 46 लाखांचे एम.डी., कोकेन, चरस जप्त (Video)