Pune Crime News | अंमली पदार्थाची तस्करी करणाऱ्या 4 जणांना गुन्हे शाखेकडून अटक; 46 लाखांचे एम.डी., कोकेन, चरस जप्त (Video)

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | पुण्यात अंमली पदार्थाची तस्करी करणाऱ्या चौघांना पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या (Pune Police Crime Branch) अंमली पदार्थ विरोधी पथक एकने Anti Narcotics Cell Pune (Pune ANC) अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या (Pune Crime News) आरोपींमध्ये एका महिलेचा समावेश आहे. पोलिसांनी आरोपींकडून 46 लाख 59 हजार रुपये किंमतीचे एम.डी. Mephedrone (MD), कोकेन (Cocaine), चरस (Hashish) हे अंमली पदार्थ जप्त केले आहेत.

सागर कैलास भोसले (वय-26 रा. शंकरनगर, खराडी, पुणे), अजितसिंग इंद्रजितसिंग भवानीया (वय-40 रा. गुडविल ऑरचीड, धानोरी), इम्ररीन गॅरी ग्रीन (वय-37 रा. खोसे पार्क, लोहगाव रोड, पुणे) यांच्यासह एका महिलेला अटक करण्यात आली आहे. आरोपींवर मुंढवा पोलीस ठाण्यात (Mundhwa Police Station) एन.डी.पी.एस. अॅक्ट (NDPS Act) नुसार गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे.

अंमली पदार्थ विरोधी पथक एकचे अधिकारी अंमलदार 14 ऑगस्ट रोजी मुंढवा पोलीस ठाण्याच्या हद्दीत पेट्रोलिंग करत होते. त्यावेळी पोलीस अंमलदार विशाल दळवी (Police Vishal Dalvi) यांना माहिती मिळाली की, बी.यु. भंडारी शोरूम (B.U. Bhandari Showroom) या ठिकाणी एक व्यक्ती व महिला ओळखीच्या लोकांना एम.डी., कोकेन अंमली पदार्थांची विक्री करत आहेत. पोलिसांनी लोणकर वस्ती येथील बी.यु. भंडारी शोरुम समोर सापळा रचून सागर भोसले आणि महिलेला ताब्यात घेतले.

पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या आरोपींकडून 44 लाख 11 हजार रुपये किंमतीचे अंमली पदार्थ जप्त केले. यामध्ये 208 ग्रॅम 950 मिलीग्रॅम मेफेड्रोन (एम.डी.) व 5 ग्रॅम 550 मिलीग्रॅम कोकेन यासह इतर साहित्य जप्त केले. आरोपींची पोलीस कोठडी घेऊन सोखल चौकशी करण्यात आली. चौकशी दरम्यान आरोपींना अजितसिंग भवानीया व इम्ररीन ग्रीन यांनी अंमली पदार्थ विक्रीसाठी दिल्याचे आरोपींनी सांगितले. पोलिसांनी दोघांचा शोध घेऊन त्यांना अटक केली. त्यांच्याकडून 2 लाख 48 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. यामध्ये 4 ग्रॅम कोरेन व 71 ग्रॅम चरस सह इतर मुद्देमाल जप्त केला. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक लक्ष्मण ढेंगळे करीत आहेत.

ही कारवाई पोलीस आयुक्त रितेश कुमार (IPS Ritesh Kumar), पोलीस सह आयुक्त संदीप कर्णिक
(IPS Sandeep Karnik), अपर पोलीस आयुक्त गुन्हे रामनाथ पोकळे (IPS Ramnath Pokale),
पोलीस उपायुक्त गुन्हे अमोल झेंडे (DCP Amol Zende), सहायक पोलीस आयुक्त गुन्हे -1 सुनिल तांबे
(ACP Sunil Tambe) यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड
(Senior PI Vinayak Gaikwad) , सहायक पोलीस निरीक्षक लक्ष्मण ढेंगळे (API Laxman Dhengle),
शैलजा जानकर (API Shailaja Jankar), पोलीस अंमलदार विशाल दळवी, मारुती पारधी, मनोज साळुंके, राहुल जोशी,
ज्ञानेश्वर घोरपडे, पांडुरंग पवार, संदीप शिर्के, प्रविण उत्तेकर, सचिन माळवे, विशाल शिंदे, रेहाना शेख, संदेश काकडे,
नितेश जाधव, योगेश मोहिते यांच्या पथकाने केली.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

18 August Rashifal : कर्क आणि कन्या राशीवाल्यांना भाग्याची साथ मिळाल्याने होणार चांगला लाभ, वाचा दैनिक भविष्य

Talathi Bharti Exam 2023 | पहिल्याच दिवशी तलाठी भरती परीक्षेचा पेपर फुटला; नाशिक, नागपूरमध्ये ऑनलाईन परीक्षेत गैरप्रकार

Pune: Anti-robbery squad arrested house burglary gang from Pimpri-Chinchwad, 18 tola gold jewellery & pistol seized