Coronavirus : Big B अमिताभनं ‘कोरोना’ला दाखवला ‘ठेंगा’, सादर केली खास कविता (व्हिडीओ)

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – देशात कोरोना व्हायरसचा प्रकोप दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. 74 लोक देशात संक्रमित आढळले आहेत. याशिवाय कोरोनानं भारतातील पहिला बळी घेतल्याचंही नुकतंच समोर आलं आहे. यानंतर आता सर्वच लोक खबरदारी घेताना दिसत आहेत. अशात बॉलिवूडचे मेगास्टार बिग बी अमिताभ बच्चन यांनी मात्र कोरोनावर एक कविताच लिहिली आहे. खास बात अशी की, त्यांनीच ही कविता सादर केली आहे.

देशभरात जिकेड तिकडे कोरनाचीच चर्चा आहे. कोरोनाची दहशतदेखील दिवसेंदिवस वाढतानाच दिसत आहे. हे लक्षात घेत आता बिग बी अमिताभ बच्चन यांनी कोरोनावर एक कविता लिहिली आहे ज्याचं सादरीकरणही त्यांनी केलं आहे. बिग बी अमिताभ यांनी एक ट्विट केलं आहे आणि कोरोनावरील त्यांच्या कवितेचा व्हिडीओ सोशलवर शेअर केला आहे. आहे. त्यांनी चाहत्यांनी सुरक्षित रहाण्याचं आवाहन केलं आहे. सध्या बिग बीं ची ही कविता खूपच व्हायरल होताना दिसत आहे. त्यांच्या अनेक चाहत्यांनी कमेंट करत यावर प्रतिक्रिया दिली आहे.

बिग बींच्या कवितेतील काही ओळी पुढीलप्रमाणे-

बहुतेरे इलाज बतावें, जन जनमानस सब,
केकर सुनै, कैकर नाहीं, कौन बताए इ सब
हम कहा चलो हमौ कर देत हैं, जैसन बोलैं सब
आवय देयो, Corona-फिरोना, ठेंगुआ दिखाऊब तब !”

अमिताभ यांच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर याच वर्षात अमिताभ बच्चन अनेक सिनेमांमध्ये दिसणार आहेत. यामध्ये ब्रह्मास्त्र, झुंड, चेहरे, गुलाबो सिताबो अशा अनेक सिनेमांचा समावेश आहे. यापैकी झुंड सिनेमाचा टीजर अलीकडेच रिलीज झाला आहे. नागराज मंजुळे या सिनेमाचं डायरेक्शन करत आहे. नागपूरमध्ये सिनेमाची शुटींग झाली आहे.